एकतर्फी प्रेमातून माथेफिरू प्रियकराने शेतात गेलेल्या मुलीची चाकू भोसकून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 18:45 IST2021-12-23T18:44:11+5:302021-12-23T18:45:51+5:30
Murder Case : प्रियकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

एकतर्फी प्रेमातून माथेफिरू प्रियकराने शेतात गेलेल्या मुलीची चाकू भोसकून केली हत्या
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका माथेफिरू प्रियकराने तरुणीची चाकूने हत्या करून पळ काढला. मुलगी शौचासाठी गेली होती, तिथे माथेफिरू प्रियकराने तिच्यावर चाकूने हल्ला केला. तरुणीचा आरडाओरडा ऐकून लोकांनी धाव घेतली. प्रियकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
एसपी हरदोई अजय कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण हरपालपूर पोलिस स्टेशनच्या काकरा गावातील आहे. एकतर्फी प्रेमातून आशिष नावाच्या २५ वर्षीय तरुणाने १८ वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबीयांच्या मदतीने मुलीला जिल्हा रुग्णालयात पाठवले. जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बायकोसोबत मौज मजा करण्यासाठी हेअर ड्रेसर बनला दुचाकीचोर
वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी ५ पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. त्याचवेळी आरोपी मुलीवर एकतर्फी प्रेम करत असे.