ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 17:56 IST2020-05-09T17:51:22+5:302020-05-09T17:56:13+5:30

कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांचा अभिनव उपक्रम

A unique initiative to reduce stress, celebrating the birthday of the on-duty police pda | ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा    

ताण कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम, ऑन ड्युटी पोलिसाचा केला बर्थडे साजरा    

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांमधील वातावरण खेळीमेळीचे राहावे आणि कर्मचाऱ्यांमधील उत्साह कायम राहावा याकरिता कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड प्रयत्न करत आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचारी ईश्वर जायभाई यांच्या वाढदिवसाचा केक कापून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी जायभाई यांचा वाढदिवस साजरा केला. 

पनवेल - कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत असल्याने कर्मचाऱ्यांमधील वातावरण खेळीमेळीचे राहावे आणि कर्मचाऱ्यांमधील उत्साह कायम राहावा याकरिता कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड प्रयत्न करत आहेत. 

 

सायन - पनवेलमहामार्गावरील मुबंई - पुणे द्रुतगती मार्गाचे प्रवेशद्वार असलेल्या कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे वाढदिवसाच्या दिवशी कार्यरत असलेल्या कळंबोली पोलीस ठाण्यातील कर्मचारी ईश्वर जायभाई यांच्या वाढदिवसाचा केक कापून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी जायभाई यांचा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी या वेळी स्वतः गाणे गात जायभाई यांना गाण्याद्वारे शुभेच्छा दिल्या.

Coronavirus Lockdown : मिठी मारली म्हणून तरुणाला चोप देणाऱ्या पोलिसाचे निलंबन  

 

काँग्रेसला दणका! ईडीने वांद्रे येथील १६.३८ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच 

 

मौलाना सादसंबंधित उत्तर प्रदेशातील बँक खाती केली सील 

Web Title: A unique initiative to reduce stress, celebrating the birthday of the on-duty police pda