शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
2
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
3
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
4
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
5
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
6
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
7
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
8
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
9
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
10
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
11
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
12
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
13
"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
14
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
15
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
16
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
17
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
18
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
20
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

Video : नारायण राणे रायगड पाेलिसांसमाेर हजर; व्हाॅईस सॅम्पल घेतले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 17:28 IST

Narayan Rane :जन आशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले हाेते.

ठळक मुद्देअवघ्या 15 मिनीटांतच पाेलिसांनी त्यांची हजेरी घेत जबाब नाेंदवला. त्यानंतर राणे बाहेर पडले.

निखिल म्हात्रेअलिबाग - न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज रायगडपोलिसांकडे हजेरी लावली. पाेलिसांनी त्यांचा जबाब नाेंदवून घेतला मात्र त्यांचे काेणतेही व्हाॅईस सॅम्पल घेतले नाही. 

जन आशिर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले हाेते.  राणे यांना महाड पाेलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले हाेते. त्यांनतर न्यायालयाने राणे यांना काही अटी, शर्तीवर जामिन मंजूर केला हाेता. 30 आॅगस्ट आणि 13 सप्टेंबर अशा दाेन दिवस राणे यांनी रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी लावावी असे आदेश न्यायालयाने दिले हाेते. 30 आॅगस्ट राेजी प्रकृती ठिक नसल्याचा अर्ज राणे यांच्या वकीलानी रायगड पाेलिसांना देत राणे गैहजर राहीले हाेते. 13 सप्टेंबरला राणे हजेरी लावणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले हाेते.

केंद्रीय मंत्री राणे हे जुहू येथील निवास्थानातून साेमवारी दुपारी 12 वाजता अलिबागकडे रवाना झाले. दुपारी ठिक आडीच वाजता जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात हजर झाले. अवघ्या 15 मिनीटांतच पाेलिसांनी त्यांची हजेरी घेत जबाब नाेंदवला. त्यानंतर राणे बाहेर पडले. 

 

 

न्यायालयाच्या आदेशानुसार मी पोलिस अधिक्षकांच्या कार्यालयात आलो. असे असले तरी मी कोणताही जबाब नोंदवला नाही. या संपुर्ण प्रकरणात रायगड पोलिसांनी सहकार्य केले.  - केंद्रीय मंत्री नारायण राणे. 

 

मागच्या वेळी येणे शक्य नव्हते त्याची कारणे लेखी स्वरूपात दिली होती. नारायण राणे यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांची जी चौकशी करायची होती ती त्यांनी केली. आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करू, व्हाॅइस सॅम्पल आज घेतले नाही. पुढची तारीख काही सांगितली नाही पोलिसांना आम्ही सहकार्य करू. - संग्राम देसाई , नारायण  राणे यांचे वकील

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNarayan Raneनारायण राणे RaigadरायगडPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरे