दुर्दैवी अंत! पाच वर्षांच्या बालकाने टेम्पोने चिरडल्याने जागेवरच सोडला प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 18:52 IST2022-03-30T18:51:24+5:302022-03-30T18:52:00+5:30
Accident Case : पोलीस आरोपी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

दुर्दैवी अंत! पाच वर्षांच्या बालकाने टेम्पोने चिरडल्याने जागेवरच सोडला प्राण
नालासोपारा : संतोष भवनच्या परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षांच्या बालकाला भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. तुळिंज पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस आरोपी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपाऱ्याच्या संतोष भवन परिसरातील शर्मावाडी येथे राहणाऱ्या अंकित गौड (वय ५) या चिमुकल्या मुलाला टेम्पोने बुधवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास चिरडले आहे. अंकित हा क्लासवरून घरी आल्यावर त्याच्या आईने त्याला दुकानात दही आणण्यासाठी पाठवले होते. तो दही घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली असल्याचे कळते.
कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलिसांना १४ वर्षांनंतर मिळाली पदोन्नती