शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

शाळा परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:15 IST

शाळा परिसरात शिक्षकातर्फे अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये असंतोष : नागपुरातील अजनीत तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा परिसरात शिक्षकातर्फे अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडखानी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. शिक्षकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पालक बुधवारी अजनी पोलीस ठाण्यात पोहोचले तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जॉन तिमोथी (४५) असे आरोपी शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.तिमोथी, कुकडे ले-आऊट येथील एका शाळेत संगीत शिक्षक आहे. पीडित ९ वर्षीय मुलगी चौथ्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील मुंबईत नोकरी करतात. ती आपल्या आजी-आजोबांसोबत राहते. असे सांगितले जाते की, काही दिवसांपूर्वी तिमोथी म्युझिक क्लास घेत होता. क्लास संपल्यावर त्याने पीडित मुलीला थांबवून ठेवले. तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. यामुळे मुलगी घाबरली. तिने आपल्या मैत्रिणींना घडलेला प्रकार सांगितला. वर्ग मैत्रिणींच्या बोलण्यामुळे ती आणखी घाबरली. या घटनेचा परिणाम तिच्या व्यवहारावर पडला. तिला मानसिक धक्का बसला. तिने आजी-आजोबांकडे डोके दुखत असल्याची तक्रार केली. आजोबांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती बिघडल्याने आईवडीलही नागपूरला पोहोचले. त्यांनी मुलीला विचारपूस केली असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. आई-वडिलांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. त्यांनी पालकांसोबत अजनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल कली. पोलिसांनी छेडखानी व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून तिमोथीला अटक केली.बुधवारी हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने इतर पालकांनाही माहिती झाले. तिमोथीनी इतर मुलींसोबतही असेच कृत्य केल्याच्या शंकेने अनेक पालक शाळेत जमा झाले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसह नारेबाजी केली. पालक शाळेतून थेट अजनी पोलीस ठाण्यात पोहोचले. मोठ्या प्रमाणावर पालक आल्याची माहिती होताच झोन चारच्या डीसीपी निर्मलादेवी ठाण्यात पोहोचल्या त्यांनी पालकांची भेट घेतली. पालकांनी त्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यासंदर्भात एक निवेदनही सादर केले. निर्मलादेवी यांनी या प्र्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.पीडित मुलीला प्रचंड मानसिक धक्काया घटनेमुळे अल्पवयीन मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहे. घटनेमुळ पालक व नागरिकांमध्ये प्रचंड असतोष पसरला आहे. त्यांनी तिमोथीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच एका कोचिंग क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. पोलिसांनी या घटनेलाही गांभीर्याने घेत आरापेीविरुद्ध कडक कारवाई केली.

 

टॅग्स :MolestationविनयभंगStudentविद्यार्थीArrestअटकTeacherशिक्षक