२ वर्षाच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन् केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 16:40 IST2022-03-25T16:40:14+5:302022-03-25T16:40:55+5:30
Rape And Murder Case : अटीबेले येथील रहिवासी असलेल्या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

२ वर्षाच्या भाचीवर कारमध्ये काकाने केला बलात्कार अन् केली हत्या
बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दोन वर्षांच्या मुलीचा तिच्या ३१ वर्षीय काकाने कारमध्ये बलात्कार करून तिची हत्या केली आहे. अटीबेले येथील रहिवासी असलेल्या कार चालकाला त्याच्या दोन वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
रविवारी २० मार्च रोजी तिचा काका चिकन खरेदी करण्यासाठी भाचीला त्याच्या घरातून घेऊन गेला होता. दरम्यान त्याने आपल्या कारमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जेव्हा ही मुलगी रडायला लागली, तेव्हा त्याने तिला जोरात थापड मारली आणि ती जागीच बेशुद्ध पडली. ३१ वर्षीय आरोपीने गुन्हा केल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयात नेलं. रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयिताची चौकशी सुरु केली. कारच्या सीटवरून पडल्यानं अपघाती मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. समोरच्या सीटवर बसलेली मुलगी आरोपीनं ब्रेक लावल्यामुळं खाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला ताबडतोब अटक केली आहे.