भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 19:01 IST2025-12-15T19:00:20+5:302025-12-15T19:01:13+5:30
टॅक्सी ड्रायव्हर बिलालने गर्लफ्रेंड उमाची हत्या केली.

भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. टॅक्सी ड्रायव्हर बिलालने गर्लफ्रेंड उमाची क्रूरपणे हत्या केली. लग्न करण्यासाठी उमा बिलालच्या मागे लागली होती. तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी बिलालने थेट तिचा काटाच काढला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबरच्या संध्याकाळी बिलाल उमाला स्विफ्ट कारमध्ये बसवून सुमारे ६ तास इकडे-तिकडे फिरवत राहिला.
हरियाणातील यमुना नगर येथील कलेसर नॅशनल पार्क येथे बिलालने उमाची निर्दयपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर तो लगेच उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील घरी पोहोचला आणि काही झालंच नाही अशा आविर्भावात फिरत होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांनी मारेकऱ्याला अटक करण्यात केली. उमा १३ वर्षांच्या मुलाची आई आहे.
उमा आधी पतीसोबत बेहट रोडवरील रमजानपुरा येथे राहत होती. त्यानंतर ती चिलकाना रोडवरील हलालपूर येथे राहायला गेली. मात्र, पतीशी वाद झाल्यावर ती गंगोत्री कॉलनीत एकटी राहू लागली. तिचा मुलगा वडिलांकडे राहायचा. सुमारे २ वर्षांपूर्वी उमाची भेट टॅक्सी ड्रायव्हर बिलालशी झाली आणि ते दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. उमाचा सर्व खर्च बिलालच करत होता, पण आरोपीच्या कुटुंबीयांना या संबंधाची जराही कल्पना नव्हती.
उमाचा आधीचा नवरा जॉनीने सांगितलं की, त्याचं १५ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, परंतु दीड वर्षांपूर्वी उमाने त्याला सोडून बॉयफ्रेंडकडे गेली, तसेच मुलासोबतही राहायचं नाही असं सांगून घटस्फोट घेतला. उमा लाकडाच्या एका कारखान्यात काम करत होती आणि घटस्फोटाच्या वेळी तिने मुलालाही स्वीकारण्यास नकार दिला होता. तिच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.