उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 08:11 PM2019-01-01T20:11:40+5:302019-01-01T20:14:01+5:30

तब्बल 1 लाख 54 हजार किमतीची 25 हजार लिटर गावठी दारूचे साहित्य जप्त करून नष्ट केले.

In the Ulhasnagar port, | उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त

उल्हासनगरात गावठी दारूचा अड्डा उद्धवस्त

Next
ठळक मुद्देनववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर गुन्हे शाखा व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पथकाने सापळा रचून छापा टाकला३ इसम गावठी दारुची भट्टी लावून दारु गाळत  असताना आढळुन आले.चार आरोपींविरुध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मु.दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)(फ) गुन्हा दाखल केला आहे.               

उल्हासनगर - विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेरे गावाच्या शिवारातील गावठी दारूचा अड्डा शहर गुन्हे अन्वेषण विभागाने उद्धवस्त करण्यात आला आहे. तब्बल 1 लाख 54 हजार किमतीची 25 हजार लिटर गावठी दारूचे साहित्य जप्त करून नष्ट केले.

उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातच्या हद्दतील माणेरेगावत चोलेकर नावाचा इसम हस्तकामार्फत अनाधिकृतपणे गावठी हातभट्टीची दारुचा अड्डा चालवीत असल्याची माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर गुन्हे शाखा व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पथकाने सापळा रचून छापा टाकला असता ३ इसम गावठी दारुची भट्टी लावून दारु गाळत  असताना आढळुन आले. त्यांचे ताब्यात २५,००० लिटर दारु बनविण्यासाठी लागणारे रसायन, २३० लिटर दारु व दारु बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ५३ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यातील रसायन व साहित्य जागीच नष्ट करण्यात आला आहे. चार आरोपींविरुध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात मु.दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)(फ) गुन्हा दाखल केला आहे.               

तसेच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्याहद्दीत मेठलनगर भागात एक इसम गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी शहर गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून दारू विक्री करणारा एक इसम आणि दारू पिणारे चार इसम यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 35 लिटर गावठी दारू व विक्री साहित्य असा एकूण दोन हजार चारशे ऐंशी रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: In the Ulhasnagar port,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.