भीषण! बाईक अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 19:45 IST2021-10-02T19:39:53+5:302021-10-02T19:45:45+5:30
Accident Case : आज दिवसभर पडलेल्या उन्हानंतर सायंकाळी पडलेल्या पावसामुळे ओल्या रस्त्यावरून ही स्कूटर घसरली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

भीषण! बाईक अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी
सिकंदर अनवारे
दासगाव - महाड तालुक्यातील बिरवाडी ढालकाठी येथे झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील तीन तरुणांपैकी दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी होण्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. हे तिन्ही तरुण याच परिसरातील असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बिरवाडी येथे गेलेले तीन तरुण घरी परतत असताना त्यांच्या ताब्यातील स्कूटर नंबर एम.एच.०६ सी ए ८७४६ ही ओल्या रस्त्यावरून घसरली. महाड भोर पुणे मार्गावर ढालकाठी येथे हा अपघात झाला. शुभम झांझे वय १६ रा. आकले, विशाल यादव वय १५ रा. ढालकाठी, आणि आदित्य घाडगे वय १६ रा. आदर्श नगर बिरवाडी अशी या तिघांची नावे आहेत. यातील शुभम झांझे आणि आदित्य घाडगे हे दोघे जागीच ठार झाले आहेत. तर विशाल यादव हा गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबई येथे अधिक उपचाराकरिता हलवले आहे. आज दिवसभर पडलेल्या उन्हानंतर सायंकाळी पडलेल्या पावसामुळे ओल्या रस्त्यावरून ही स्कूटर घसरली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हे तिन्ही तरुण विद्यार्थी याच परिसरातील असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.