चंदीगड: जालंधर फगवाडा महामार्गावरील धानोवलीजवळ सोमवारी सकाळी एका वेगवान ब्रिजा कारने दोन तरुणींना धडक दिली. या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव नवज्योत कौर असे असून ती धन्नोवली येथील रहिवासी आहे. नवज्योत कौर कॉस्मो ह्युंदाईमध्ये काम करायची. ती तिच्या मैत्रिणीसोबत पायी जात होती, तेव्हा भरधाव कारने दोघांना उडवले. या अपघातात नवजोतचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली, ज्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक वेगाने गाडी चालवत होता आणि धानोवली गेटफाटकजवळ दोनमुलींना चिरडल्यानंतर पळून गेला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यात दोन तरुणी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. भरधाव वेगात येणारी कार पाहून ते दोघेही मागे गेले. मग पटकन ब्रीजा येते आणि त्यांना चिरडून निघून जाते. आरोपी पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.जालंधर फगवाडा महामार्गावर आज या घटनेविरोधात निदर्शने करण्यात आली. लोकांनी मागणी केली की, जोपर्यंत या कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हा महामार्ग मोकळा केला जाणार नाही. मृत मुलीची आई तेजेंद्र कौर यांनी सांगितले की, आमची मुलगी सकाळी कामासाठी निघाली असताना ती वाटेत नवली गेटजवळ रस्ता ओलांडत होती, तेव्हा एका वेगवान कारने तिला धडक दिली आणि आरोपी पळून गेला. एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी आहे. तेजेंद्र कौरसह इतर महिलांनी सांगितले की, जोपर्यंत या कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत महामार्ग उघडला जाणार नाही. घटनास्थळी पोहचलेले एसीपी बलविंदर इक्बाल सिंग म्हणाले की, आम्ही वाहनाचा शोध घेतला आहे. ड्रायव्हरला लवकरच अटक केली जाईल. यानंतर आरोपी उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली.
दोन तरुणींना दिली भरधाव कारने धडक; सीसीटीव्हीत आरोपी पोलीस अधिकारी कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 20:01 IST
Accident Case : ती तिच्या मैत्रिणीसोबत पायी जात होती, तेव्हा भरधाव कारने दोघांना उडवले. या अपघातात नवजोतचा जागीच मृत्यू झाला.
दोन तरुणींना दिली भरधाव कारने धडक; सीसीटीव्हीत आरोपी पोलीस अधिकारी कैद
ठळक मुद्देही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली, ज्यामध्ये एक पोलीस उपनिरीक्षक वेगाने गाडी चालवत होता आणि धानोवली गेटफाटकजवळ दोनमुलींना चिरडल्यानंतर पळून गेला.