वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:29 IST2022-02-22T19:28:55+5:302022-02-22T19:29:35+5:30
Accident Case : विलास काशिनाथ जगधने (वय ५५, रा. आंभोळ, ता. अकोले) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना
घारगाव (जि. अहमदनगर) : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी फाटा येथे एका दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी चालक जागेवर गतप्राण झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२२) दुपारी अडीच वाजलेच्या सुमारास घडली. विलास काशिनाथ जगधने (वय ५५, रा. आंभोळ, ता. अकोले) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील आंभोळ येथील रहिवासी तथा लक्ष्मी मंगल कार्यालय (घारगाव ता. संगमनेर) येथील कर्मचारी विलास जगधने हे मंगळवारी (दि. २२) नाशिक - पुणे महामार्गाने आळेफाटा येथून दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.१७ ए.एक्स.६२२५) घारगाव येथे परतत असताना ते दुपारी अडीच वाजलेच्या सुमारास कुरकुंडी फाट्याजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात ते जागेवर ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख,पोलीस नाईक किशोर लाड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पोलिस पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात नेण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करीत आहेत.