उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 21:33 IST2022-03-02T21:23:44+5:302022-03-02T21:33:25+5:30
Accident Case :घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली.

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू तर एक गंभीर
मूर्तिजापूर : दर्यापूर रस्त्यावरील पायटांगी व सिरसो दराम्यान २ ट्रॅक्टरला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने एक जण घटनास्थळीच ठार झाल तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली २ मार्च रोजी संध्याकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली घडली.
मूर्तिजापूर - दर्यापूर रोडवर वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर क्रमांक एमएच २६ के८१७३ चे डीजल संपल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टॅक्टर वर पाठीमागून मूर्तिजापूर कडे येणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ३७ झेड ६२१५ सदर ट्रॅक्टर ला धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील किशोर सुदाम गवई वय ४४ राहणार जोडगव्हाण वाशीम, हल्ली मुक्काम सुकळी ता. अकोला हे घटनास्थळीच ठार झाले, तर त्याचा सहकारी शाहीद रजा हा गंभीररीत्या जखमी झाला असुन त्यास स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहे.