शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'ओव्हरटेक' करू दिलं नाही म्हणून पोलिसांनी काय केलं बघा; एक्स्प्रेस-वे वरचा धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 13:47 IST

साध्या वेशातील पोलिसांनी ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले, मात्र त्यांना साईड न तरुणांनी साईड दिली नाही..

ठळक मुद्देदुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना मारहाण करणारे दोन पोलीस कर्मचारी निलंबित 

लोणावळा : मुंबई- पुणे महामार्गावर खाजगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलिसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले, मात्र त्यांना साईड न दिल्याच्या कारणावरून सदरचे तरुण व साध्या वेशात असलेले पोलीस कर्मचारी यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की झाली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीवरून जाणार्‍या तरुणांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी दोन पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी रात्री गवळीवाडा येथे ही घटना घडली.    लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील जयराज देवकर व माणिक अहिनवे अशी या निलंबित केलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रफुल्ल बोराडे (वय ३०, रा. ओळकाईवाडी लोणावळा ) यांनी तक्रार दिली होती.    सोमवारी रात्री दोन दुचाकी गाड्यांवरून चार तरुण लोणावळा बाजारपेठेकडे येत असताना मुंबई- पुणे महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ खाजगी चारचाकी वाहनांमधून आलेल्या दोन साध्या वेशातील पोलिसांनी दुचाकी गाडीला ओव्हरटेक करण्यासाठी हॉर्न वाजवले, मात्र त्यांना साईड न दिल्याच्या कारणावरून सदरचे तरुण व साध्या वेशात असलेले पोलीस कर्मचारी यांच्यात शिविगाळ व धक्काबुक्की झाली. याचा विपर्यास भांडणात झाल्याने दोन्ही गटाकडून एकमेकाला मारहाण करण्यात आली. यात पोलीसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाला फार मार लागला असून एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. 

     मावळचे आमदार सुनिल शेळके व लोणावळ्यातील राजकीय पदाधिकार्‍यांनी याबाबत मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्यात जाऊन गुंडगिरी करणार्‍या पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली. शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी घटनेची माहिती घेऊन पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांना घटनेचा अहवाल पाठविला होता. संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर सदर दोन पोलीस कर्मचार्‍यांचे पोलीस अधिक्षक यांनी निलंबन केले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबनhighwayमहामार्ग