शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

शिवनेरीतील प्रवाशांची बॅग चोरणारे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 12:13 PM

शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी बस स्थानकांतून प्रवाशांच्या किंमती ऐवज असलेल्या बॅग चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती़...

ठळक मुद्देआरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे, मनमाड, करमाळा येथे यापूर्वी गुन्हे दाखल

पुणे : शहरातील एसटी बस स्थानकातून शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लॅपटॉपसह बॅग चोरणाऱ्या सराइताला त्याच्या साथीदारासह स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे़. दिलीप दशरळ डिकोळे (वय ३०, रा़ घोटी, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि समाधान भारत भोसले (वय ३१, रा़ नेरले, करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़. त्यांच्याकडून ४ लाख ४० हजार रुपयांचे विविध कंपन्यांचे १९ लॅपटॉप जप्त केले आहेत़. आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर ठाणे, मनमाड, करमाळा येथे यापूर्वी गुन्हे दाखल आहेत़. काही दिवसांपासून शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी बस स्थानकांतून प्रवाशांच्या किंमती ऐवज असलेल्या बॅग चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती़. त्यामुळे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्याचे पथक बस स्थानकावर तैनात केले होते़. बस स्थानकातील सीसीटीव्हीची पाहणी करत असताना पोलिसांना काही जण संशयास्पद आढळून आले़. त्यांची माहिती घेतली असताना चोरी करणारा दिलीप डिकोळे याच्यासारखा दिसत असल्याचे आढळून आले़. त्यामुळे पोलिसांनी तातडीने दोन पथके करमाळा येथे पाठविली़. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी डिकोळे याला ताब्यात घेतले़ त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली़. तसेच, चोरी केलेले लॅपटॉप तो विक्रीसाठी समाधान भोसले याच्याकडे देत असल्याचे सांगितले़. त्यावरून पोलिसांनी भोसले याला अटक केली़. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक  शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक  सुरेश जायभाय, संजय आदलिंग, पोलीस कर्मचारी सज्जाद शेख, दशरथ गभाले, सचिन कदम, विजय कुंभार, सोमनाथ कांबळे, सचिन दळवी, संदीप साळवे, ज्ञानेश्वर बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे यांच्या पथकाने केली.............अशी करीत असे चोरीदिलीप हा आत्तापर्यंत पोलिसांच्या जाळ्यात सापडत नव्हता. चोरी करण्यासाठी तो शिवनेरी बसची निवड करी. ज्या प्रवाशांकडे लॅपटॉपची बॅग आहे, असे सावज तो हेरत होता. लॅपटॉप असलेल्या प्रवाशाच्या सीटजवळ उभे राहून तो स्वत:कडील बॅग लॅपटॉप असलेल्या बॅगजवळ ठेवत असे़. गाडी सुटण्याच्या वेळी लॅपटॉप असलेली बॅग घेऊन स्वत:ची बॅग तेथेच ठेवून तो गाडीतून खाली उतरत असे़. ....दिलीप डिकोळे हा सोलापूर, नांदेड, औरंगाबाद, नाशिक या परिसरातही चोऱ्या करीत असे़. पुणे शहरातील ५ गुन्हे उघडकीस आले असून जप्त केलेले आणखी १४ लॅपटॉप कोणाचे आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत़. शिवनेरीतून प्रवास करताना ज्यांच्या लॅपटॉपची बॅग चोरीला गेली, त्यांनी स्वारगेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांनी केले आहे़. 

टॅग्स :PuneपुणेlaptopलॅपटॉपtheftचोरीArrestअटक