पिंपरी : कर्ज स्वरुपात दिलेल्या रकमेचे व्याज आणि मुद्दल परत मिळावी, यासाठी वारंवार घरी जाऊन गोंधळ घालणे, आत्महत्या करण्याची भीती घालणे अशा प्रकारे सातत्याने त्रास दिला. एवढेच नव्हे तर फिर्यादीच्या मुलाची दुचाकी उचलुन नेली. दुचाकी आणण्यासाठी गेलेल्या मुलाला त्रास दिला. हा त्रास असह्य झाल्याने पवन (वय २२) या मुलाने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरूद्ध भोसरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवन किसनराव केंद्रे (वय ४२) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मांडुबाबा पालवे तसेच गयाबाई पालवे आरोपींची नावे आहेत. जीवन केंद्रे हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक आहेत. ते भोसरी इंद्रायणीनगर परिसरात भाड्याने खोली घेऊन राहतात. त्यांचे मूळगाव बोरगाव, हर्सूल, ता. जवळकोट, जिल्हा लातूर असे आहे. त्यांनी पालवे यांच्याकडून हातउस पैसे घेतले होते. मात्र ही रक्कम कर्ज स्वरुपात दिली असून मुद्दलाची रक्कम आणि व्याज परत मिळावे, यासाठी आरोपी वेगवेगळ्या पद्धतीने केंद्रे कुटुंंबियांना त्रास देत होते. असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
भोसरीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 13:01 IST
कर्ज स्वरुपात दिलेल्या रकमेचे व्याज आणि मुद्दल परत मिळावी, यासाठी वारंवार घरी जाऊन गोंधळ घालणे, आत्महत्या करण्याची भीती घालणे अशा प्रकारे सातत्याने त्रास दिला.
भोसरीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांवर गुुन्हा दाखल
ठळक मुद्देसावकारी वसुलीचा तगादा ; दोघांविरूद्ध फिर्याद