शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी मिळाली सोनमची 'ती' बॅग; राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:32 IST

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात शिलाँग पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे.

Raja Raghuvanshi Murder Case: मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. राजाची हत्या त्याची पत्नी सपना आणि तिच्या प्रियकराने मिळून केली होती. राजाच्या हत्येनंतर सपना रघुवंशी फरार झाली होती. मात्र १७ दिवसांनी ती उत्तर प्रदेशात सापडली. या प्रकरणात आतापर्यत सोनमसह तिचा प्रियकर राजा आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी दोघांना अटक झाली. 

इंदौर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकाने राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेशात दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या अटकेसह या प्रकरणात अटक केलेल्यांची एकूण संख्या सात झाली आहे. इंदौर न्यायालयाने प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्स आणि सुरक्षा रक्षक बल्ला अहिरवार यांना सात दिवसांसाठी मेघालय पोलिसांच्या ट्रान्झिट कोठडीत पाठवले आहे.

शनिवारी रात्री पोलिसांच्या विशेष तपास पथकाने प्रॉपर्टी डीलर सिलोमला अटक केली. राजा रघुवंशीची पत्नी सोनमची एक बॅग लपवल्याचा आरोप या सिलोमवर आहे. गेल्या महिन्यात हत्येनंतर सोनमने ती बॅग इंदौरमधील एका फ्लॅटमध्ये लपवली होती. मेघालय पोलिसांच्या एसआयटीने मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील भोनरासा टोल-गेटवरून सिलोम जेम्स नावाच्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती ईस्ट खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विवेक सिम यांनी दिली.

राजा हत्या प्रकरणातील आरोपी विशाल चौहानला शिलोमने फ्लॅट भाड्याने दिल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी सोनम राजा रघुवंशीची हत्या केल्यानंतर लपून बसली होती. प्रॉपर्टी डीलर सिलोम जेम्सच्या अटकेनंतर पोलिसांनी इमारतीच्या गार्डलाही अटक केली. बल्ला अहिरवार पकडला जाईल या भीतीने पळून गेला होता. पोलिसांनी त्याला अशोकनगर येथील त्याच्या गावातून अटक केली.

या प्रकरणात पोलिसांना एक महत्त्वाचा पुरावा एका रिक्षा चालकाकडून मिळाला होता ज्याने ३ मे रोजी नंदबागहून हिराबागला एक बॅग पोहोचवली होती. ती बॅग राजा आणि सोनमची होती आणि नंतर फ्लॅटमध्ये लपवण्यात आली. पोलिसांनी ती बॅग देखील जप्त केली. राजाची हत्या केल्यानंतर शिलाँगहून परतल्यानंतर सोनम हिराबादमधल्या त्या फ्लॅटमध्ये राहत होती. हा फ्लॅट सिलोम जेम्सचा होता, जो राजाचा मित्र विशाल सिंग ठाकूर याने  १७,००० रुपये भाड्याने घेतला होता. ८ ऑक्टोबर रोजी आकाशच्या अटकेची माहिती मिळताच सोनम कारने गाजीपूरला पळून गेली आणि तिचे सामान फ्लॅटमध्ये राहिले.

पोलिसांनी ३ ते १० जून दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता शिलोम जेम्स त्याच्या गाडीत तीच बॅग घेऊन जाताना दिसला. ९ जून रोजी सोनमने गाजीपूरमध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि दुसऱ्या दिवशी सिलोम जेम्सच्या फ्लॅटवर पोहोचला. या दरम्यान, सिलोमने सोनमची बॅग घेतली आणि तेथून निघून गेली. बॅगमध्ये एक देशी बनावटीची पिस्तूल, ५ लाख रुपये रोख, राजाची चेन, मोबाईल आणि सोनमचे कपडे आणि दागिने होते. सोनमला अटक केल्यानंतर, पोलिस त्या बॅगचा शोध घेत होते. सिलोमच्या अटकेनंतर पोलिसांनी बॅग जप्त केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस