शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

कात्रज येथे कॉलेज कॅटिंनच्या दोन कामगार मुलांचे सापडले मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 11:40 AM

आमच्या मुलांचा मृत्यु पेस्ट कंट्रोलने नाही तर मारहाणीमुळे झाल्याचा संशय मृतांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मृत मुलांपैकी एकाच्या हाताला जखम झाली होती. 

ठळक मुद्देपेस्ट कंट्रोलमुळे मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाजदोघांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यातून मृत्युचे खरे कारण स्पष्ट होणार

पुणे : कात्रज येथील पी़ आय़ कॉलेजच्या कँटिनमध्ये काम करणारे दोघे जण त्यांच्या खोलीमध्ये मृतावस्थेत सापडले असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अजय राजू बेलदार (वय२०, रा. जळगाव) आणि अनंता खेडकर (वय २०, रा. बुलढाणा) अशी त्यांची नावे आहेत़. प्राथमिक तपासात  पेस्ट कंट्रोलमुळे दोघांचा मृत्यु झाल्याची माहिती पुढे आली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज येथील पी़ आय कॉलेजच्या कॅटिनमध्ये हे दोघेही गेल्या एक वषार्पासून काम करतात. कॉलेजच्या कॅटिनमध्ये काम केल्यावर दोघे जण त्यांच्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दोघेही कामाला न आल्याने कॅटिनचा मॅनेजर त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या खोलीवर गेला. दार  वाजवूनही ते उघडल्याने त्यांनी मागील बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता. या घटनेची माहिती दोघांच्याही नातेवाईकांना देण्यात आली. त्याचे नातेवाईक आज सकाळी पुण्यात आले. आमच्या मुलांचा मृत्यु पेस्ट कंट्रोलने नाही तर मारहाणीमुळे झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्यातील एकाच्या हाताला जखम झाली होती. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांनी सांगितले की, दोघेही एकाच खोलीत रहात होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी ढेकूण मारण्याचे औषध खोलीत फवारले होते. त्यामुळे पहिल्या दिवशी ते मित्रांच्या खोलीवर जाऊन राहिले होते. एक दिवसानंतर ते आपल्या खोलीवर झोपायला गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आपल्या खोलीत झोपले. पण, खोली पूर्णपणे बंद असल्याने श्वास गुदमरुन व विषारी औषधाच्या वासाने त्यांचा मृत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.आम्ही खोलीची पाहणी केल्यावर त्या खोलीत अजूनही वास येत होता. तेथे काही पालीही मरुन पडल्या होत्या. त्यांनी अगदी खिडक्यांना टेप लावून त्या बंद केल्या होत्या. कॅटिनच्या मॅनेजरने खिडकीतील पाण्याची बाटली त्यांच्या अंगावर टाकून त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. पण ते न उठल्याने त्यांनी खिडकी तोडली. खिडकीचे ग्रील तोडून काढताना त्याचा काचा तुटल्या. त्या खिडकी खालीच ते दोघे झोपले होते. खिडकीची काच पडल्याने त्यांच्यातील एकाच्या हाताला जखम झाली असावी. नातेवाईकांच्या उपस्थितीत आज दोघांचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यातून मृत्युचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :katrajकात्रजPuneपुणेDeathमृत्यूPoliceपोलिसcollegeमहाविद्यालय