नशीला पदार्थ पाजून दोन भावांनी महिलेचे केले लैंगिक शोषण अन् धमकीही दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 14:36 IST2022-07-21T14:36:09+5:302022-07-21T14:36:57+5:30
Gangrape Case :अश्लील व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नशीला पदार्थ पाजून दोन भावांनी महिलेचे केले लैंगिक शोषण अन् धमकीही दिली
उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, दोन तरुणांनी तिला पाण्यात नशीला पदार्थ दिला, त्यानंतर तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. तसेच अश्लील व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिला सतत ब्लॅकमेल केले जात आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी घडली. गावातील एका खोलीत तिला नशीला पदार्थ पाजला, त्यानंतर सामूहिक बलात्कार केला. वैतागलेल्या महिलेने तिच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर पीडित तरुणी हादरली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. दोन्ही आरोपी सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे.