दारू दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक; एकावर तब्बल २० गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 13:32 IST2021-09-15T13:31:51+5:302021-09-15T13:32:03+5:30

भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीत संदीप बॅलिस्टर सिंह यांचे भाईंदर वाईन नावाने दारूचे दुकान आहे

Two arrested for burglary; As many as 20 cases were registered against him | दारू दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक; एकावर तब्बल २० गुन्हे दाखल

दारू दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघांना अटक; एकावर तब्बल २० गुन्हे दाखल

मीरारोड - भाईंदर पूर्वेला एका दारूच्या दुकानाचा दरवाजा तोडून रोख व महागड्या दारूच्या बाटल्या चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील एका आरोपीवर घरफोडी व चोरीचे तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. 

भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीत संदीप बॅलिस्टर सिंह यांचे भाईंदर वाईन नावाने दारूचे दुकान आहे. मध्यरात्री ते पहाटे दरम्यान चोरट्यानी मागील दार तोडून दुकानातील ३५ दारूच्या बाटल्या व रोख असे मिळून ३ लाख ८० हजारचा मुद्देमाल चोरून नेला होता. संदीप सिंह यांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक संदीप मोहोळ सह रविंद्र भालेराव, ऐनोद्दीन शेख, संदीप जाधव, युनुस गिरगावकर व अमित कुमार पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषण, पुरावे व माहितीच्या आधारे पोलिसांनी परशुराम बळीराम चौधरी (४०) रा. शांती अपार्टमेंट, तुळींज मार्ग, नालासोपारा व प्रविण बच्चन चांदेलिया (२९) रा. मीरारोड आर टी ओ जवळ या दोघांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोख व दारू मिळून २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल आरोपीं कडून जप्त केला आहे. उर्वरित रोख आदींचा शोध पोलीस घेत आहेत.  परशुराम वर घरफोडी - चोरीचे तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. 
 

Web Title: Two arrested for burglary; As many as 20 cases were registered against him