शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाखांच्या घरफोडी प्रकरणी दिल्लीवरुन दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 21:06 IST

चोरुन पळालेल्या टोळी पैकी दोघांना नवघर पोलीसांनी दिल्ली वरुन अटक केली आहे.

मीरारोड - भाईंदर मधील एका पुजापाठ करणाराया पुरोहिताच्या बंगल्यात घरफोडी करुन १४ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन पळालेल्या टोळी पैकी दोघांना नवघर पोलीसांनी दिल्ली वरुन अटक केली आहे. त्यांच्या कडुन ६ लाखांचे दागीने व रोख जपत केले असुन त्यांचे ३ साथीदार व उर्वरीत मुद्देमालाचा शोध पोलीस घेत आहेत.भाईंदर पुर्वेच्या गोल्डन नेस्ट मधील बंगला क्र. ६ मध्ये राहणारे प्रशांत पाठक (६५) हे पुजापाठ करणारे पुरोहित आहेत. ते व त्यांचे कुटुंबिय १४ डिसेंबर रोजी विरारच्या अर्नाळा येथे एक दिवसाच्या सहली साठी गेले होते. रात्री पावणे नऊ वा. घरी आले असता मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरातील ६० हजार रोख , ३५ तोळे सोन्याचे दागीने व ८ किलो चांदी असा १४ लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता.या घरफोडीची वरिष्ठांनी दखल घेतली. पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड व अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपास कामी पोलीसांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले होते. उपअधीक्षक शशिकांत भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, निरीक्षक संपतराव पाटील आदिंच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक योगेश काळेंसह राठोड, भालेराव, वाघ, गिरगावकर, वाकडे, माने, शिंदे, ठाकुर आदिंच्या पथकाने तपास सुरु केला.परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे ४ संशयीत व दिल्ली येथील नोंदणी असलेली मोटार कार आढळुन आली होती. सदर कारचा शोध घेता ती दिल्ली येथे असल्याचे समजल्यावर पोलीसांचे पथक गुन्ह्यातील कार व आरोपींच्या शोधासाठी दिल्ली येथे सुमारे १५ दिवस तळ ठोकुन होते. तपासात पोलीसांनी अमन अस्लम खान (१९) रा. राठी पिरवाली मस्जीद, खोडा, गाजियाबाद व अमित नारायण प्रसाद गुप्ता (३५) रा. मयुर विहार, दिल्ली या दोघा आरोपींना अटक करुन भार्इंदरला आणले आहे.आरोपीं कडुन ६ लाखांची दागीने व रोख, घरफोडीत वापरलेले साहित्य जप्त करण्यात आली आहे. ठाणे न्यायालयाने आरोपींना १७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गुन्ह्यात सहभागी त्यांच्या अन्य तीघा साथीदारांसह चोरीच्या उर्वरीत मुद्देमालाचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती शशिकांत भोसले यांनी पत्रकारांना दिली.अमित वर पुणे, नवी मुबई, मुलुंड हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल असुन तो सराईत घरफोड्या आहे. आरोपी हे दिल्ली वरुन येत आणि टेहळणी वेळी बंद घर आढळले की घरफोडी करुन पुन्हा दिल्लीला पसार होत. दिल्लीला ते भाड्याने रहात व सतत राहण्याची ठिकाणे बदलत अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकMira Bhayanderमीरा-भाईंदरRobberyचोरी