ट्युशन शिक्षिका विद्यार्थ्याला बांधायची राखी, वडिलांशी होते शारीरिक संबंध; 7 वर्षात 40 लाख उधळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 21:57 IST2022-03-25T21:47:53+5:302022-03-27T21:57:10+5:30

Murder Case : व्यावसायिक कपिल गुप्ता आणि ट्यूशन शिक्षिका प्रियंका खत्री यांच्यात 7 वर्षांपासून अफेअर सुरू असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते.

Tuition teacher tie rakhi to student, had physical contact with father; 40 lakh spent in 7 years | ट्युशन शिक्षिका विद्यार्थ्याला बांधायची राखी, वडिलांशी होते शारीरिक संबंध; 7 वर्षात 40 लाख उधळले 

ट्युशन शिक्षिका विद्यार्थ्याला बांधायची राखी, वडिलांशी होते शारीरिक संबंध; 7 वर्षात 40 लाख उधळले 

अलवर - राजस्थानमधील अलवरमध्ये ट्युशन घेणारी शिक्षिका प्रियांका खत्रीच्या हत्येप्रकरणी एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आरोपी कपिल गुप्ता याने चौकशीत असे खुलासे केले, ज्यामुळे पोलिसही आश्चर्यचकित झाले. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचे वडील व्यवसायाने व्यापारी होते. तो स्वतःहून 10 वर्षांनी लहान असलेल्या ट्युशन शिक्षिकेच्या प्रेमात इतका वेडा झाला की, मुलीचा सर्व खर्च तो स्वतः उचलू लागला. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने मुलीच्या राहणीमान आणि हत्येबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. व्यावसायिक कपिल गुप्ता आणि ट्यूशन शिक्षिका प्रियंका खत्री यांच्यात 7 वर्षांपासून अफेअर सुरू असल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते.

प्रियंकाला सुंदर दिसण्याची खूप आवड होती, असे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे. यासाठी ती अनेक प्रकारची औषधे घेत असे. त्याचा खर्च तो स्वत: उचलत असे. कपिल म्हणाला, प्रियांकाची गळा आवळून हत्या करण्यात आली. यादरम्यान आवाज बाहेर जाऊ नये म्हणून कारमध्ये मोठ्या आवाजात गाणे वाजविण्यात आले. तिची हत्या केल्यानंतर पत्नी आणि दोन नोकरांच्या मदतीने मृतदेह प्रथम गोणीत भरला आणि नंतर तो नीमरणाजवळ फेकून दिला.

प्रेमात वेड्या झालेल्या एका व्यावसायिकाने लाखोंचा खर्च केला

कपिल सांगतो की, प्रियांकाने जेव्हा मुलांना शिकवायला सुरुवात केली तेव्हा दोन वर्षातच त्यांच्यात संबंध निर्माण झाले. प्रियांकाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. आरोपीचे म्हणणे आहे की, त्याने 7 वर्षात प्रियांकावर 40 लाख रुपये खर्च केले. आश्‍चर्याची बाब म्हणजे या दोघांच्या नात्याची माहिती पत्नीला कळू नये म्हणून प्रियंका आपल्या मुलाला आपला भाऊ मानून राखी बांधत असे. पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, प्रियांकाला या जोडप्यासोबत राहायचे होते. त्याने लग्नाची ऑफरही दिली होती. याआधीही तिची दोनदा एंगेजमेंट झाली होती, पण ती पुढे लग्न होऊ देत नसे,स्थळं  आली की खोट्या गोष्टी सांगून तोडायची.


एवढेच नाही तर प्रियांकाने कुटुंबीयांवर दबाव कायम ठेवण्यासाठी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.१६ मार्चला प्रियांकाचा मृतदेह अलवरच्या तातारपूर भागात प्लास्टिकच्या गोणीत सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे पोलिसांनी वाहनाचा क्रमांक शोधून काढला. त्यानंतर दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

Web Title: Tuition teacher tie rakhi to student, had physical contact with father; 40 lakh spent in 7 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.