कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला वाहनाने चिरडले; वाहनचालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 19:53 IST2018-09-05T19:53:38+5:302018-09-05T19:53:56+5:30
अतुल घागरे असे मृत्यूमुखी पडलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला वाहनाने चिरडले; वाहनचालक फरार
नवी मुंबई - पनवेल मुंब्रा मार्गावर वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाचा वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. अतुल घागरे असे मृत्यूमुखी पडलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल मुंब्रा मार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही पोलिसांसाठी देखील मोठी डोकेदुखी बनली आहे. घागरे हे वाहतूकीची कोंडी सोडविण्यासाठी तळोजा येथील निळतज फाट्यावर उभे होते. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका गाडीने त्यांना धडक दिली. या धडकेत घागरे गाडीखाली येऊन चिरडले गेले. पोलीस सध्या घागरे यांच्या अपघाताला जबाबदार असलेल्या वाहनचालकाचा शोध घेत आहेत.