पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 13:54 IST2018-10-18T13:53:51+5:302018-10-18T13:54:19+5:30
जळगाव - शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळील झोपडीत राहणाऱ्या मजुराच्या 5 वर्षांच्या मुलीवर अज्ञाताने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी ...

पाच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; संशयिताला अटक
जळगाव - शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळील झोपडीत राहणाऱ्या मजुराच्या 5 वर्षांच्या मुलीवर अज्ञाताने अत्याचार केल्याची घटना गुरुवारी पहाटे समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस, तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तपासाची सुत्रे फिरवत राणा सिकलगर नावाच्या समता नगर मधील संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू असून तेथे काम करणारे मजूर कुटुंब कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा स्कूलजवळ झोपडीत राहते. हे सर्व कुटुंबीय रोजची कामे पूर्ण करून पात्री झोपले होते. त्यानंतर पहाटे साडेतीनच्या सुमारास पीडितेच्या वडील आणि काकांना तिच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर चिमुरडी रक्तबंबाळ अवस्थेत पडजली होती. अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यांनी आसपास शोध घेतला पण कोणीही मिळाले नाही. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञांना बोलावले आहे. तसेच मुलीच्या आई वडिलांचा जबाब देखील नोंदवून घेतला आहे.
आतून बंद होते घर
घटनेसंदर्भात पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, ते घरामध्ये नेहमीप्रमाणे आतून बंद करून झोपलेले होते. पण घराची कडी कोणी उघडली आणि हा प्रकार कोणी केला याबाबत माहिती नसल्याचे ते म्हणाले. कोणावर संशय नसल्याचेही सांगितले. तसेच घरातील मोबाईल चोरीला गेला असल्याचेही सांगितले.