Beed Crime: आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:12 IST2025-09-11T14:08:39+5:302025-09-11T14:12:40+5:30

Beed Crime News: बीडमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी चिमुकलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Toddler body found three days after father death in Beed | Beed Crime: आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक

Beed Crime: आधी वडिलांचा मृतदेह सापडला, तीन दिवसांनी चिमुकली...; भांडणानंतर घराबाहेर पडले होते बाप-लेक

Beed Crime: आत्महत्येच्या एका प्रकरणामुळे बीडच्या इमामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. बीड शहरालगत असलेल्या इमामपूर परिसरात मागच्या दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर आता तिसऱ्या दिवशी त्याच व्यक्तीच्या मुलीचा मृतदेह गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. वडिलांसोबत दोन दिवसांपूर्वीच मुलगी बाहेर पडली होती. त्यानंतर आता दोघांचेही मृतदेह सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पती-पत्नीत वाद झाल्यानंतर मी माझ्या मुलीला घेऊन जातो असे म्हणत पतीने तीन वर्षांच्या मुलीसोबत घर सोडले होते. मात्र दोन दिवसांपूर्वीच मुलीच्या वडिलांचा मृतेदह सायंकाळी ४ वाजता इमामपूर रोडवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र मुलीचा शोध लागत नव्हता. बीड ग्रामीण पोलिसांचे पथक आणि नातेवाईक मुलीचा शोध घेत होते. अखेर गुरुवारी तीन वर्षाच्या मुलीचाही गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला.

जयराम बोराडे असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. जयरामची पत्नी माहेरी औरंगपूर येथे आहे. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये मंगळवारी भांडण झाले होते. या भांडणानंतर जयरामने मी माझ्या मुलीला घेऊन जातो असे म्हणत तीन वर्षाच्या अक्षराला सोबत घेऊन घर सोडले. जयरामसोबत जात असताना अक्षरा रडत होती. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण ती ऐकत नव्हती. त्यामुळे त्याने एका

हॉटेलवर थांबून तिला बिस्कीट दिले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यानंतर जयरामने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेतली. मात्र पोलिसांना तिथे अक्षरा आणि जयरामची बाईक सापडली नाही. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढलं.

गुरुवारी सकाळी याच परिसरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या व्यक्तीला झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत अक्षराचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून हा प्रकार अपघात आहे की आत्महत्या याचा तपास करत आहेत.

Web Title: Toddler body found three days after father death in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.