पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने संपवले आयुष्य, आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 09:57 PM2022-01-11T21:57:05+5:302022-01-11T21:57:26+5:30

Suicide Case : सध्या या तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Tired of his wife's affair, the husband committed suicide, he also ran away and got married | पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने संपवले आयुष्य, आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्...

पत्नीच्या अफेअरला कंटाळून पतीने संपवले आयुष्य, आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केला व्हिडीओ अन्...

googlenewsNext

राजगढ   : मध्य प्रदेशातील राजगढमध्ये पत्नीच्या अफेअरला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने एक व्हिडिओही बनवला असून या व्हिडिओमध्ये तरुणाने पत्नीचे मुस्लिम तरुणासोबत अफेअर असल्याचे सांगितले. सध्या या तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

काय प्रकरण आहे?
ही घटना राजगढ जिल्ह्यातील बमलाबे गावातील आहे. तेथे राहणाऱ्या मुकेश सेन नावाच्या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मुकेशने पूजा नावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. राजगढचे एसपी सांगतात की, मुकेश काही वर्षांपूर्वी पूजासोबत घरातून पळून गेला होता. त्यावेळी पूजा ही अल्पवयीन होती. या प्रकरणी मुकेशविरोधात न्यायालयात खटलाही सुरू आहे. मुकेशने आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याची पत्नी पूजाचे नदीम अन्सारी नावाच्या तरुणासोबत अफेअर आहे.

मुकेशने व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याच्या पत्नीचे कुटुंबीयही त्याला धमक्या देत आहेत आणि पत्नीचा प्रियकर नदीमनेही त्याच्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मुकेशने विष प्राशन करून आत्महत्या केली. अलिकडच्या काळात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे लोकांनी पत्नीच्या विश्वासघाताला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.

Web Title: Tired of his wife's affair, the husband committed suicide, he also ran away and got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.