क्षुल्लक कारणावरून सहप्रवाशाला लोकलमधून फेकले बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 14:39 IST2019-12-05T14:37:47+5:302019-12-05T14:39:11+5:30
या घटनेत बाहेर फेकलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

क्षुल्लक कारणावरून सहप्रवाशाला लोकलमधून फेकले बाहेर
मुंबई - हार्बर मार्गावरील वाशीहून सीएसएमटीसाठी ८.५२ वाजता सुटलेल्या लोकल ट्रेनमध्ये आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. जागेवरून उठण्यास नकार दिल्याने सहप्रवाशाला लोकलमधून बाहेर फेकण्यात आले. ही घटना टिळकनगर आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेत बाहेर फेकलेला सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रवाशाचे नाव विजय गुप्ता असं आहे.
मुंबई - जागेवरुन उठण्यास नकार दिल्याने सहप्रवाशाला ट्रेनबाहेर फेकलं, टिळकनगर स्थानकाजवळील घटना https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) December 5, 2019
लोकलमध्ये बसण्यास सीट मिळविण्यासाठी हाणामारीचे प्रकार लोकल ट्रेनमध्ये सर्रास घडतात. आज लोकलमध्ये जागेवरून झालेले भांडण सहप्रवाशाला जीवावर बेतलं आहे. भांडणातून सहप्रवाशी असलेल्या विजय गुप्ताला लोकलमधून टिळकनगर आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान बाहेर फेकले आहे. सकाळच्या दरम्यान ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लोकलमध्ये नेहमी पाहायला मिळते. या गर्दीत जागेवरून झालेले भांडण विजय यांना महागात पडलं आहे. गंभीर जखमी झालेल्या विजयला सायन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.