थरारक! जुन्या वैमनस्यातून कुख्यात गुंडाची हत्या; आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 15:12 IST2021-05-14T15:11:41+5:302021-05-14T15:12:05+5:30
Murder Case : शानु हा कुख्यात गुंड होता. त्याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.

थरारक! जुन्या वैमनस्यातून कुख्यात गुंडाची हत्या; आरोपींची धरपकड करण्यासाठी पोलिसांची धावपळ
नागपूर : जुन्या वैमनस्यातून गुंडाच्या एका टोळीने कुख्यात गुंड शानु उर्फ शहानवाज याची निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सकाळी १०. १५ च्या सुमारास गांधी गेट महाल भागात ही थरारक घटना घडली.
शानु हा कुख्यात गुंड होता. त्याच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीएसह विविध कारवाईदेखील केली होती. तीन वर्षांपूर्वी त्याने कुख्यात प्रवीण घाटे वर प्राणघातक हल्ला केला होता. तेव्हापासून घाटे टोळीसोबत त्याचे वैमनस्य आले होते. शानुचा गेम करण्यासाठी ते संधी शोधत होते. या पार्श्वभूमीवर, शानू आज सकाळी दुचाकीने जात असताना त्याच्या मागावर असलेले सौरभ घाटे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी त्याला गांधी गेट जवळ गाठले आणि शस्त्राचे घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. ही माहिती कळताच कोतवाली पोलिसांचा ताफा, पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनीही तेथे भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला.
वृत्त लिहिस्तोवर आरोपींची धरपकड करण्यासाठी कोतवाली पोलिसांची धावपळ सुरू होती.