थरारक! मुलाने केला जन्मदात्याचा खून; पुसद तालुक्यात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 20:08 IST2021-08-02T20:07:30+5:302021-08-02T20:08:59+5:30

Murder Case : ही घटना शनिवारी रात्री घडली. रविवारी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Thrilling! Child murder of father; panic situation in Pusad taluka | थरारक! मुलाने केला जन्मदात्याचा खून; पुसद तालुक्यात उडाली खळबळ

थरारक! मुलाने केला जन्मदात्याचा खून; पुसद तालुक्यात उडाली खळबळ

ठळक मुद्देपुंजाजी हरसूजी दीपके (४५) असे मृत वडिलांचे नाव आहे. तेे आपल्या मुलीस सासरी जा, असे सांगून वाद निर्माण करीत होते.

पुसद  (यवतमाळ) : तालुक्यातील बोरी (खुर्द) येथे मुलानेच जन्मदात्याचा खून केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. रविवारी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.


पुंजाजी हरसूजी दीपके (४५) असे मृत वडिलांचे नाव आहे. तेे आपल्या मुलीस सासरी जा, असे सांगून वाद निर्माण करीत होते. शनिवारी रात्री ७ सात वाजताच्या दरम्यान पुंजाजी दिपके नेहमीप्रमाणे घरात वाद घालत होते. यामुळे त्यांचा १५ वर्षीय मुलगा संतापला. त्याने संतापाच्या भरात लाकडी काठीने पुंजाजी यांच्या डोक्यावर व अंगावर वार केले. यात पुंजाजी दिपके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, रात्री त्यांचा मृत्यू झाला.


या घटनेची सीताराम हरसूजी दिपके (५०) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

 

 

Web Title: Thrilling! Child murder of father; panic situation in Pusad taluka