शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलचे दुकान फोडणारे तिघे अटकेत, एक फरार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 01:33 IST

Crime news : चाेरट्यांकडून विविध कंपन्यांचे २२ महागडे माेबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची तीन लाख १२ हजार एवढी किंमत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

नालासोपारा - पूर्वेतील मोबाइलचे दुकान फाेडणाऱ्या तीन चाेरट्यांना तुळिंज पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे २२ महागडे माेबाइल जप्त करण्यात आले असून त्यांची तीन लाख १२ हजार एवढी किंमत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

जया पॅलेसजवळील सूर्यकीर्ती सोसायटीमध्ये विशाल जैन यांचे श्रीनाथ मोबाइल ॲण्ड गिफ्ट कलेक्शन हे दुकान आहे. ६ ऑक्टाेबरला चोरट्यांनी या दुकानाच्या पाठीमागच्या खिडकीचे ग्रील उचकटून विविध कंपन्यांचे ३२ मोबाइल आणि रोख रक्कम असा चार लाख ४५ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल चोरला हाेता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांना या चाेरट्यांचा तपास, सुगावा लागताच त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी आणि त्यांच्या पथकाला सूचना देऊन कल्याणला पाठवले. पाेलिसांनी सापळा लावून २२ ऑक्टाेबरला राजकुमार पांचाळ (वय ३८), जमिल सिद्दिकी (४०) आणि यासिन ऊर्फ अस्लम मकबूल खान (३५) यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख १२ हजारांचे २२ मोबाइल जप्त केले आहेत. तिघांना शुक्रवारी वसई न्यायालयाने सात दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. मुंबई, नवी मुंबई, भाईंदर, ठाणे, वसई तालुका याठिकाणी प्रत्येकी २५ ते ३० गुन्हे दाखल आहेत. या तिघांचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा पाेलीस शाेध घेत आहेत.

चाेरीची चांदी झवेरी बाजारात विकलीराजकुमार पांचाळ याने भाईंदर येथील सत्यम ज्वेलर्समध्ये साथीदारांसह साडेअकरा लाखांची चोरी केली होती. तेव्हापासून ताे फरार होता. या दुकानात चाेरी केलेली पाच किलाे चांदी मुंबईतील झवेरी बाजारामध्ये विकल्याची त्याने पोलीस चौकशीत कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्याचा पुढील तपासकामी भाईंदर पोलिसांना ताबा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी