पिंपरीत बोलणे बंद केल्याच्या रागाने तरूणीला अॅसिड हल्ल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:29 IST2018-10-17T16:28:37+5:302018-10-17T16:29:31+5:30
बोलणे बंद केले, याचा राग आल्याने एकाने तरूणीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवुन अॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे.

पिंपरीत बोलणे बंद केल्याच्या रागाने तरूणीला अॅसिड हल्ल्याची धमकी
पिंपरी : बोलणे बंद केले, याचा राग आल्याने एकाने तरूणीला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवुन अॅसिड टाकण्याची धमकी दिली आहे. ही घटना मंगळवारी निदर्शनास आली. तरूणीने फिर्याद दिल्यामुळे ठाणे येथे राहणाऱ्या तरूणाविरूद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय बाबुराव पाटील (रा. कोपरखैरणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे येथे राहण्यास असलेल्या तरूणाची बावधन येथे राहणाऱ्या तरूणीशी ओळख आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने तिला धमकीचे मेसेज पाठविले आहेत.तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलेस तर, मी अॅसिड टाकून तुझी वाट लावेन अशी धमकी त्याने दिली आहे. फेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. अचानक तरूणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. त्यामुळे त्याने चिडून मेसेज पाठविले आहेत. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम.एल जाधव या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.