शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

जादूटोणा करून कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी; महिलेला लुबाडणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 8:14 PM

मुलाने त्याच्या मित्राला दिलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देतो, असे सांगून जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला..

ठळक मुद्देखंडणी, फसवणूक तसेच अनिष्ट, अघोरी कुप्रथा व जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल

पुणे : मुलाने त्याच्या मित्राला दिलेले सोन्याचे दागिने परत मिळवून देतो, असे सांगून जादूटोणा करून कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या मुलाचे दागिने मित्र परत करत नव्हता. आरोपी सुनीता सोनी व इतर दोघांनी दागिने परत मिळविण्यासाठी देवीची पूजा करून प्रसन्न करावे लागेल, असे सांगितले. त्यासाठी पैसे घेतले. आणखी पैसे देण्यास नकार दिल्यावर जादूटोण्याद्वारे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.  पोलिसांनी खंडणी, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी कुप्रथा व जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत शिवाजीनगर येथील एका ३८ वर्षांच्या सफाई कामगार महिलेने फिर्याद दिली असून, हा प्रकार सोमवार पेठ पोलीस अधिकारी वसाहतीत डिसेंबर २०१९ ते ५ जुलै २०२० दरम्यान घडला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : या महिलेच्या मुलाने मित्राला सोन्याचे दागिने दिले होते. तो ते दागिने परत देत नव्हता. या महिलेची जोगवा मागणाऱ्या सुनीता पवळे ऊर्फ सोनी हिच्याबरोबर ओळख झाली. हे दागिने परत मिळविण्यासाठी देवीची पूजा करून तिला प्रसन्न करावे लागेल, असे फिर्यादी महिलेला सांगण्यात आले. त्यासाठी या महिलेकडून वेळोवेळी २ हजार, ३ हजार रुपये घेतले. अशा प्रकारे तिच्याकडून आतापर्यंत १५ हजार रुपये घेतले. त्यानंतरही ते पैसे मागत होते. तेव्हा या महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिला व तिच्या कुटुंबीयांची जादूटोणाद्वारे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन शिवीगाळ केली. या प्रकाराने या महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर, तिने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी खंडणी, फसवणूक तसेच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी कुप्रथा व जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीPoliceपोलिसFamilyपरिवार