वैभवसह दोघांची सीबीआयच्या कार्यालयात कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 13:54 IST2018-08-20T13:53:42+5:302018-08-20T13:54:23+5:30
सीबीआयला या तिघांच्या चौकशीतून आणखी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

वैभवसह दोघांची सीबीआयच्या कार्यालयात कसून चौकशी
मुंबई - नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक असलेला आरोपी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरला रविवारी मध्यरात्री नवी मुंबईतील बेलापूर येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात चौकशीसाठी येण्यात आले होते. रात्रभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना नवी मुंबईहून आज सकाळी चौकशीसाठी पुण्याला नेण्यात आले आहेत. तेथे सीबीआयकडून त्यांची चौकशी सुरु असल्याची एटीएस सूत्रांकडून समजत आहे. यांच्या अटकेमुळेच डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा मारेकरी सचिन अणदुरे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच सीबीआयला या तिघांच्या चौकशीतून आणखी महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
नालासोपा-यातील स्फोटक प्रकरण, आरोपी श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी