शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या, 20 दिवसांतील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 13:15 IST

लहान मुलीचा मृतदेह हा गावातील एका ऊसाच्या शेतात आढळून आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

लखनऊ - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 20 दिवसांमध्ये बलात्कार आणि हत्येची ही तिसरी घटना असल्याची माहिती मिळत आहे. लहान मुलीचा मृतदेह हा गावातील एका ऊसाच्या शेतात आढळून आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांची मुलगी बुधवारपासून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतात तिचा मृतदेह आढळला आहे. तसेच तिच्या शरीरावर काही खुणाही सापडल्या आहेत. मुलीच्या वडिलांनी गावातच राहणाऱ्या एका व्यक्तीवर आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप केला आहे. जुन्या शत्रुत्वामुळे आपल्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

गेल्या 20 दिवसांत अशा घटना घडत असल्याने गावकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुली घरातून गायब होतात. त्यानंतर त्यांचा मृतदेह शेतात मिळतो. तसेच मेडिकल रिपोर्टमधून त्यांच्यावर बलात्कार झाल्याची माहिती समोर येत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने दोन मुलींची हत्या झाली होती. त्यानंतर त्यांचे मृतदेह सापडले होते. विरोधी पक्षांनी यावरून योगी सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! शुद्धीकरणासाठी तरुणीला केलं निर्वस्त्र, 400 लोकांसमोर घातली आंघोळ

राजस्थानाच्या सीकरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. शुद्धीकरणासाठी एका प्रेमी युगुलाला निर्वस्त्र केल्याचा भयंकर प्रकार समोर आला. या दोघांना जवळपास 400 लोकांसमोर गावात आंघोळ घालण्यात आली. सीकरमधील एका गावात ही लाजिरवाणी घटना घडली. खाप पंचायतीच्या आदेशानंतर प्रेमी युगुलासोबत असं वर्तन करण्यात आलं. गावातील एका तरुण-तरुणीच्या प्रेमसंबंधांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे पंचांनी या दोघांचं शुद्धीकरण करण्याचा आदेश दिला. तसेच दंडही ठोठावला. शुद्धीकरण करताना या दोघांना निर्वस्त्र करून जवळपास 300 ते 400 गावकऱ्यांच्या उपस्थितीत आंघोळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात एका आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची लज्जास्पद घटना घडली होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. महिलेवर अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता आणि पंचायतीने तिला एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र एवढा दंड भरणं महिलेला शक्य झालं नाही. दंड न भरल्याने पंचांनी महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! मुलाचा मृतदेह घेण्यासाठी रात्रभर रुग्णालयाबाहेर पावसात भिजण्याची कुटुंबीयांवर आली वेळ 

Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू

धक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेश