Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 11:15 AM2020-09-04T11:15:05+5:302020-09-04T11:19:51+5:30

ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

man ordered camera 1lakh 40 thousand Amazon online and get old shoes and stone | Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

Amazon वरुन मागवला 1.40 लाखांचा कॅमेरा पण आल्या चपला आणि दगड, ऑनलाईन खरेदीत अजब भानगड

Next

नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो.  ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. अ‍ॅमेझॉनवरून एका व्यक्तीने 1.40 लाखांचा कॅमेरा मागवला होता. मात्र प्रत्यक्षात घरी चपला आणि दगड आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुमित चौहान यांनी काही दिवसांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग करीत कॅमेरा मागविला होता. सुमित यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या अ‍ॅमेझॉनमधून कॅमेरा मागविला होता. मात्र घरी जेव्हा ऑर्डर आली ती पाहून त्यांना धक्काच बसला. बॉक्स उघडल्यानंतर त्यांना कॅमेऱ्याऐवजी जुन्या चपला आणि दगड मिळाले आहेत. या एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

सुमित यांनी 27 ऑगस्ट रोजी अ‍ॅमेझॉनवरुन आपल्या क्रेडिट कार्डवरुन 1.40 लाखांचा कॅमेरा बुक केला होता. कॅमेरा जेव्हा घरी आला तेव्हा ते हैराण झाले कारण बॉक्समध्ये त्यांना जुन्या चपला आणि दगड देण्यात आले होते. बॉक्स उघडतानाचा एक व्हिडीओ सुमितने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. चपला आणि दगड मिळाल्यानंतर सुमितने पॅकेटवर दिलेल्या डीलरच्या नंबरवर फोन केला. त्यावेळी डिलरने कॅमेरा पाठवण्यात आल्याची मााहिती दिली.

डिलरकडून असं उत्तर मिळाल्यानंतर सुमित यांनी अ‍ॅमेझॉनशी संपर्क साधला. अनेकदा इमेल केल्यानंतर अ‍ॅमेझॉनने त्यांना उत्तर दिलं असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तसेच त्यांनी याबाबत ग्राहकाची माफी मागितली आहे. एक हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पश्चिम बंगालच्या मालदा येथील भाजपाचे खासदार खागेन मुर्मू यांची देखील याआधी ऑनलाईन फसवणूक झाली होती. खागेन मुर्मू यांनी आपल्यासाठी सॅमसंगचा स्मार्टफोन ऑनलाईन ऑर्डर केला होता. मात्र जेव्हा पार्सल हातात आलं आणि त्यांनी ते उघडून पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण फोनच्या बॉक्समध्ये मोबाईल नसून दोन दगड होते. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; हादरवणारी आकडेवारी

रिया चक्रवर्ती आणि सॅम्युल मिरांडाच्या घरी NCBने टाकली धाड, ड्रग्स प्रकरणात तपास सुरू

धक्कदायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या...

लय भारी! Amazon लवकरच करणार ड्रोनने डिलिव्हरी, फक्त 30 मिनिटांत सामान येणार घरी

Web Title: man ordered camera 1lakh 40 thousand Amazon online and get old shoes and stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.