धक्कादायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 08:33 AM2020-09-04T08:33:44+5:302020-09-04T10:04:19+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.

kolkata family claims corona victims body ventilator for 2 days hospital bill | धक्कादायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर

धक्कादायक! बिल वाढवण्यासाठी कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 2 दिवस ठेवला व्हेंटिलेटरवर

Next

कोलकाता - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 38 लाखांचा टप्पा पार केला आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना कोलकातामध्ये घडली आहे. बिल वाढवण्यासाठी मृत्यू झाल्यावरही कोरोना रुग्णाला 2 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

कोरोनाग्रस्ताच्या नातेवाईकांनी एका खासगी नर्सिंग होमवर रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बिलासाठी व्हेंटिलेटरवर ठेवल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुगळी जिल्ह्यातील एका 55 वर्षीय कोरोना रुग्णाला एका खासगी नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. नर्सिंग होमने 31 ऑगस्टला 47 हजारांचं बिल दिलं. ते बिल भरल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. कोरोना रुग्णाला पाहण्यासाठी कुटुंबीयाने वारंवार विनंती केली होती. मात्र नर्सिंग होमने त्यांना पाहण्याची परवानगी दिली नसल्याचं रुग्णाच्या मुलाने सांगितलं आहे. 

CoronaVirus News : दिल्ली, मुंबई नाही तर 'हे' शहर आहे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, चिंताजनक आकडेवारी

नातेवाईकांनी बिल भरलं तेव्हा लगेच डॉक्टरांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती  दिली असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. तर दुसरीकडे नर्सिंग होमने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णाची परिस्थिती गंभीर असताना त्यांना येथे दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना व्हेंटिलेशन सपोर्टवर ठेवणं गरजेचं होतं. त्यांची कोरोना चाचणीही झाली नव्हती. चाचणी केली असता त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आल्याचं म्हटलं आहे. 

CoronaVirus News : कोरोनाचा भयावह वेग! उपचारासाठी दाखल झाल्यानंतर 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू

कोरोना रुग्णाची प्रकृती बिघडल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली होती असं देखील नर्सिंग होमने म्हटलं आहे. कोलकाता पोलिसांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होताच 24 तासांत 31 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. पण याच दरम्यान कोरोनाचा धडकी भरवणारा वेगही समोर आला आहे. कोरोनाची लक्षणं जाणवत नसतानाही अनेकांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहे. वेळीच कोरोनाचा धोका लक्षात न आल्यामुळे तसेच वेळेत उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी, म्हणाल्या...

लय भारी! Amazon लवकरच करणार ड्रोनने डिलिव्हरी, फक्त 30 मिनिटांत सामान येणार घरी

जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना झाला फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला"

बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण

Web Title: kolkata family claims corona victims body ventilator for 2 days hospital bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.