नसरापूर : पुणे-सातारा महामार्गालगत कापूरव्होळ येथील भरचौकात ‘बालाजी ज्वेलर्स’ या दुकानावर पोलिसांच्या वेशात येत युवकांनी दरोडा टाकला. दुकानातील सोने चोरून नेत दुकानाबाहेर गोळीबार करत लुटारूंनी कारमधून पलायन केले. या दुकानातील किती सोने चोरीला गेले असावे, याबाबत पोलिसांना माहिती मिळालेली नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
थरारक! पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी सराफ दुकान लुटले; गोळीबार करत झाले फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 11:21 IST
पुणे - सातारा महामार्गालगतच्या कापूरव्होळ मधली खळबळजनक घटना..
थरारक! पोलिसांच्या वेशात चोरट्यांनी सराफ दुकान लुटले; गोळीबार करत झाले फरार
ठळक मुद्देचोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद