शिक्रापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; १९ लाख ५० हजारांची रक्कम लंपास  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 21:46 IST2020-12-26T21:45:07+5:302020-12-26T21:46:12+5:30

शिक्रापूर येथे स्टेट बँकचें या अगोदर देखील अशाप्रकारे एटीएम मशीन फोडून चोरी करण्यात आली होती.

Thieves hijack ATM machine at Shikrapur; 19 lakh 50 thousand in theft | शिक्रापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; १९ लाख ५० हजारांची रक्कम लंपास  

शिक्रापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; १९ लाख ५० हजारांची रक्कम लंपास  

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पाबळ चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या दोन एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास फोडून त्यामधील सुमारे १९ लाख पन्नास हजार रुपये व एक एटीएम मशीन स्कार्पिओ गाडीत टाकून पळ काढला.याबाबत सकाळी माहिती कळताच घटनास्थळी शिक्रापूर पोलिसांनी पाहणी केली. 

शिक्रापूर येथे स्टेट बँकेचे या अगोदर देखील अशाप्रकारे एटीएम मशीन फोडून लाख रुपयांची चोरी करण्यात आली होती. वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांना सांगून देखील या ठिकाणी एटीएम मशीनला सिक्युरिटी गार्ड नसल्याने चोरीचे प्रकार वाढत आहे. शुक्रवारी बँकेला सुट्टी असल्यामुळे सकाळी उघडकीस आलेला प्रकार समजून देखील अधिकारी वर्ग उशिरा आल्याने मशीनमधील १९ लाख पन्नास हजार व अडीच लाखाची मशीन असा बावीस लाखाची रक्कम चोरीला गेली. 

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहेत. 

Web Title: Thieves hijack ATM machine at Shikrapur; 19 lakh 50 thousand in theft