६ महिन्यांपूर्वी संसार थाटला, ७ दिवसांपूर्वी घरी परतले अन् एका रात्रीत सर्व संपलं! 'त्या' दोघांसोबत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 10:12 IST2026-03-05T10:10:34+5:302026-03-05T10:12:24+5:30

गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका प्रेमी युगुलाच्या प्रेमप्रकरणाचा शेवट अत्यंत भीषण झाला आहे.

They got married 6 months ago, returned home 7 days ago, and it all ended in one night! What happened to 'those' two? | ६ महिन्यांपूर्वी संसार थाटला, ७ दिवसांपूर्वी घरी परतले अन् एका रात्रीत सर्व संपलं! 'त्या' दोघांसोबत काय घडलं?

AI Generated Image

एकीकडे संपूर्ण देश होळीच्या रंगात न्हाऊन निघाला असताना, बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील प्राण बिघा गावात मात्र स्मशान शांतता पसरली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या एका प्रेमी युगुलाच्या प्रेमप्रकरणाचा शेवट अत्यंत भीषण झाला आहे. आपल्या प्रेमाचा स्वीकार होणार नाही, या भीतीने या जोडप्याने एकाच वेळी विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी सकाळी एका लिंबाच्या झाडाखाली या दोघांचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमकं प्रकरण काय?

मुलगा २५ वर्षांचा राजीव कुमार आणि त्याची प्रेयसी यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, घराच्यांचा विरोध असल्याने साधारण सहा महिन्यांपूर्वी हे दोघेही गावातून पळून गेले होते. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी राजीव विरोधात अपहरणाचा गुन्हाही दाखल केला होता. सहा महिने अज्ञातवासात राहिल्यानंतर, अवघ्या सात दिवसांपूर्वी मुलगी अचानक आपल्या घरी परतली होती. मात्र राजीव तेव्हाही बेपत्ताच होता.

त्या रात्री नेमकं काय घडलं?

परिजनांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत मुलगी घरातच होती. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास ती कुणालाही काहीही न सांगता घरातून गायब झाली. प्राथमिक अंदाजानुसार, फरार असलेला राजीव गुपचूप गावात आला असावा आणि त्याने मुलीला फोन करून शेतात भेटायला बोलावले असावे. सकाळी जेव्हा गावकरी शेताकडे गेले, तेव्हा लिंबाच्या झाडाखाली दोघांचे मृतदेह पडलेले दिसले.

घटनास्थळी काय आढळले?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एफएसएल टीमसह धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना तिथे काही धक्कादायक पुरावे मिळाले आहेत. मृतदेहाजवळ एक मोबाईल फोन फुटलेल्या अवस्थेत सापडला. पुरावा नष्ट करण्यासाठी किंवा रागाच्या भरात तो फोडला असावा, असा संशय आहे. तर, दोघांच्या मृतदेहाजवळ विषारी रसायनाचे डबे सापडले आहेत, ज्यावरून त्यांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.

होळीच्या उत्साहावर विरजण

या घटनेमुळे मुरगाव पंचायतीत शोककळा पसरली आहे. पळून जाऊन लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या जोडप्यावर घरच्यांचा किंवा समाजाचा कोणताही दबाव होता का? या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत. "पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, पण प्राथमिक दृष्ट्या ही प्रेमप्रकरणातून केलेली आत्महत्या वाटते," असे पोलिसांनी सांगितले.

Web Title : फरार जोड़े ने घर वापसी के बाद आत्महत्या कर ली, दुखद अंत!

Web Summary : बिहार में एक भागे हुए जोड़े ने, पारिवारिक विरोध का सामना करते हुए, जहर खाकर दुखद अंत कर लिया। वे छह महीने पहले भाग गए थे और लड़की आत्महत्या से कुछ दिन पहले ही घर लौटी थी। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Eloped couple returns home, dies by suicide in tragic end.

Web Summary : A runaway couple in Bihar, facing family opposition, tragically ended their lives by consuming poison. They had eloped six months prior and the girl returned home just days before the suicide. Police are investigating the circumstances.