पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 10:18 IST2025-07-14T10:15:56+5:302025-07-14T10:18:03+5:30

Crime UP : सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलगा आणि मुलगी पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी आपली ओळखपत्रे देखील जमा केली होती.

They booked a room in a hotel, claiming to be husband and wife. As soon as they entered, the young man shot the young woman and... | पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 

पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 

उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील गौरी शंकर पॅलेस होमस्टेमध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मृत तरुण-तरुणी प्रियकर-प्रेयसी असल्याचं सांगितलं जात आहे. मृतांची ओळख देवरिया येथील 'आयुष कुमार' आणि बाराबंकीतील दरियाबाद विधानसभा मतदारसंघातील 'अरोमा' अशी पटली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषने आधी त्याची प्रेमिका अरोमाच्या डोक्यात गोळी मारली आणि नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सायंकाळी होमस्टेच्या कर्मचाऱ्यांनी चहासाठी दार वाजवल्यावर या घटनेची माहिती समोर आली. बराच वेळ दार न उघडल्याने पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत दरवाजा तोडला असता, तरुण-तरुणीचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, खोलीत एक बेकायदेशीर पिस्तूल आणि दोन काडतुसेही सापडली आहेत. दोघांच्याही डोक्यात गोळी लागली होती.

व्हिडीओग्राफी करत उघडला दरवाजा
एसपी सिटी चक्रपाणि त्रिपाठी यांनी सांगितलं की, गौरी शंकर पॅलेसमध्ये तरुण-तरुणी थांबले होते. हॉटेलने माहिती दिली की, आतून खोली बंद आहे आणि दार वाजवूनही ते उघडत नाहीयेत. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि व्हिडीओग्राफी करत दरवाजा उघडला. दोघांनाही गोळी लागल्याच्या जखमा आढळल्या आहेत. एसपी सिटीच्या मते, दोघांनीही स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे.

पती-पत्नी असल्याचं सांगून थांबले होते दोघे!
गौरीशंकर पॅलेसचे मालक हेमंत जयस्वाल यांनी सांगितलं की, सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलगा आणि मुलगी पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी आपली ओळखपत्रे (आयडी) देखील जमा केली होती. १२ वाजेपर्यंत हे लोक बाहेर पडले आणि नंतर रूममध्ये गेल्यानंतर बाहेर आले नाहीत. सायंकाळी मी हॉटेलमध्ये आलो, तेव्हा माझ्या कर्मचाऱ्यांना चहा विचारण्यासाठी जायला सांगितलं. जेव्हा कर्मचाऱ्यांनी जाऊन दार वाजवलं, तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार वाजवूनही न उघडल्याने पोलिसांना सूचना देण्यात आली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

अयोध्येत सध्या हिंदू होमस्टेची संख्या मोठी आहे. ज्या होमस्टेमधून हे मृतदेह सापडले आहेत, तो एका भाजप नेत्याचा असल्याचं सांगितलं जात आहे. आता या घटनेनंतर काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गौरी शंकर गेस्ट हाऊसमध्ये केवळ मुलाचं आयडी घेऊन रूम कशी दिली गेली आणि मुलीचं आयडी का घेतलं नाही? विशेष म्हणजे, तरुण-तरुणी दोघांचंही वय कमी होतं. याव्यतिरिक्त, गोळी झाडल्याचा आवाज कोणालाच कसा ऐकू आला नाही, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Web Title: They booked a room in a hotel, claiming to be husband and wife. As soon as they entered, the young man shot the young woman and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.