बापरे! मक्याच्या कणसाआड होता कोटींचा गांजा, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 08:02 PM2020-08-01T20:02:52+5:302020-08-01T20:03:49+5:30

या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

There were crores of ganja in the corn husk, a big action of Thane police | बापरे! मक्याच्या कणसाआड होता कोटींचा गांजा, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

बापरे! मक्याच्या कणसाआड होता कोटींचा गांजा, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

Next
ठळक मुद्देगांजा हा अमली पदार्थ घेऊन ठाण्यात एक ट्रक येणार असल्याची माहिती चितळसर पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई किरण रावते यांना मिळाली होती. हा गांजा कोठून आणण्यात आला व तो ठाण्यात कोणाला सप्लाय करण्यात येणार होता याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.

ठाणे : मक्याच्या कणसाने भरलेल्या ट्रकमधून 691किलो गांजा शनिवारी पहाटे चितळसर पोलिसांनी घोडबंदर रोड येथे पकडला. या गांजा या आम्ली पदार्थाची तस्करी करणारा हा ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. त्या ट्रकसह एक कोटी  63 लाखाचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
       

गांजा हा अमली पदार्थ घेऊन ठाण्यात एक ट्रक येणार असल्याची माहिती चितळसर पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई किरण रावते यांना मिळाली होती. मिळालेल्या माहिती नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे, पोलीस उपनिरीक्षक धनराज केदार व त्यांच्या पथकाने शनिवारी (1ऑगस्ट) पहाटे 3 वाजेच्या सुमारास घोडबंदर रोड वरील तत्वज्ञान विद्यापीठ जवळ नाकाबंदी केली होती.
     

यावेळी घटनास्थळी एक लाल रंगाचा ट्रक बेवारसपणे उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता त्यात मक्याची कणसे व त्याखाली गांजा लपवून ठेवल्याचे दिसून आले. पोलिसांनी गांजा व ट्रक जप्त केला. यावेळी ट्रक मध्ये तब्बल 691 किलो गांजा मिळून आला. या गांजाची किंमत 1 कोटी 38 लाख रुपये इतकी असून जप्त ट्रकची किंमत 25 लाख इतकी असल्याचे पोलिसांनी संगीतले. सदर ट्रकचा नंबर केए 28 ए 9095 असा असून त्यावरील चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात एनडीपीएस आक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोठून आणण्यात आला व तो ठाण्यात कोणाला सप्लाय करण्यात येणार होता याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

 

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Web Title: There were crores of ganja in the corn husk, a big action of Thane police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.