मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 04:54 PM2020-08-01T16:54:36+5:302020-08-01T16:55:08+5:30

पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही. कोविडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केले. आकासापोटी सदरची कारवाई करण्यात आलेली आहे, असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे. अविनाश जाधव यांना कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

MNS district president Avinash Jadhav remanded in police custody till Monday | मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext
ठळक मुद्दे कापूर बावडी पोलिस ठाण्यातून कोर्टात नेत असताना अविनाश जाधव बाहेर येताना मनसे कार्यकर्त्यांनी फुले उधळली.

ठाणे : कापूर बावडी पोलीस ठाण्यातून कोर्टातील हजेरीसाठी जाताना मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर फुल उधळली, तसेच मनसैनिकांची घोषणाबाजी केली. ठाणे प्रशासनाकडून जाधव यांना तडीपारीची नोटीस काढली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हेगारी स्वरूपाचा खटला नाही. कोविडसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांनी आंदोलन केले. आकासापोटी सदरची कारवाई करण्यात आलेली आहे, असे मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे. अविनाश जाधव यांना कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आज गणेश उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची बुकिंग मनसेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. 12 तारखेपासून गाड्या कोकणात सोडण्यात येणार आहेत. सरकार कोकणवासीयांकडे लक्ष देत नसल्यामुळे मनसे काम करत असल्याचे नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे. ठाणे कोविड रुग्णालयातील नर्सेस यांना तडकाफडकी  कामावरून काढून टाकल्याने मनसेने आंदोलन केले होते.

तडीपारीची नोटीस, कोर्टात नेताना मनसैनिकांचा अविनाश जाधवांवर फुलांचा वर्षाव

कापूर बावडी पोलिस ठाण्यातून कोर्टात नेत असताना अविनाश जाधव बाहेर येताना मनसे कार्यकर्त्यांनी फुले उधळली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. अलीकडेच वसई-विरार महापालिकेत त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर काल ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना तडीपारीची नोटीस बजावली आहे.

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश

 

गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी

 

मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल 

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

 

वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद

Web Title: MNS district president Avinash Jadhav remanded in police custody till Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.