शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या दुरांतोमध्ये चोरी : चित्रपट निर्मात्याच्या मुलाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:06 IST

चित्रपट निर्मात्याच्या मुलाचा महागडा मोबाईल व इतर साहित्य दुरांतो एक्स्प्रेसमधून चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देअज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चित्रपट निर्मात्याच्या मुलाचा महागडा मोबाईल व इतर साहित्य दुरांतो एक्स्प्रेसमधून चोरीला गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अभिषेक इंगळे (२४) रा. गणेश मंदिराजवळ, बडकस चौक असे प्रवाशाचे नाव आहे. त्याचे शिक्षण सुरू आहे. तो संगीत क्षेत्राशी निगडित आहे. त्याचे वडिल लहानू इंगळे हे प्रसिद्ध वाजंत्री पथकाचे संचालक असून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काम करतात. अभिषेक शुक्रवारी रात्री मुंबईवरून नागपूरकडे येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये बसला. त्याच्यासोबत आणखी एक महिला होती. ते एस ५ कोचमधून प्रवास करीत होते. रात्री त्याने आपले महत्त्वाचे साहित्य लेडीज पर्समध्ये ठेवले. रात्रीची वेळ असल्यामुळे सर्व प्रवासी झोपेत होते. ही संधी साधून अज्ञात आरोपीने पर्स चोरून नेली. भुसावळ रेल्वेस्थानक येण्यापूर्वी झोपेतून जागे झाल्यानंतर अभिषेकने पर्स पाहिली असता ती आढळली नाही. पर्सचा शोध घेतला असता ती कुठेच सापडली नाही. पर्समध्ये ८२ हजार रुपये किमतीचा आयफोन, दुसरा एक मोबाईल, महत्त्वाचे कागदपत्र आणि ५ हजार रुपये रोख असा एकूण एक लाखाचा मुद्देमाल होता. नागपूरात गाडी येताच अभिषेकने लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वेtheftचोरी