पुण्यातील सहकारनगरमध्ये दोन सोसायट्यांत ९ घरफोडया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 13:50 IST2019-07-29T13:41:37+5:302019-07-29T13:50:18+5:30

शहरातील विविध भागात सोनसाखळी हिसकाविण्यासह घरफोड्यांचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे.

theft in nine plats between at two societies in Sahakarnagar | पुण्यातील सहकारनगरमध्ये दोन सोसायट्यांत ९ घरफोडया

पुण्यातील सहकारनगरमध्ये दोन सोसायट्यांत ९ घरफोडया

ठळक मुद्दे पार्किंगमधील कार पळवली : बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रक्कम चोरली

पुणे : शहरातील विविध भागात सोनसाखळी हिसकाविण्यासह घरफोड्यांचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी सहकारनगरमधील सरोजिनी व उषा अपार्टमेंट या दोन सोसायट्यांमधील ९ फ्लॅटमध्ये घरफोड्या केल्या; तसेच पार्किंगमध्ये उभी केलेली ५ लाख रुपयांची अलिशान कार चोरून नेली आहे. विशेषत: बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरीमुळेपोलिसांपुढे तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. 
याप्रकरणी संजय लगड (वय ४६, रा. सहकारनगर) आणि शारदा भालेराव  (वय ६२, रा. सहकारनगर) यांनी दत्तवाडी पोेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तर सौरभ महाजन, चंद्रशेखर करमरकर, औसेकर यांच्या फ्लॅटमध्ये घरफोडी झाली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सहकारनगरमधील उषा सोसायटीत शारदा यांची मुलगी मेघना विनोद संसारे राहायला आहेत. २४ ते २७ जुलै दरम्यान ते बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून २ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यांच्याच सोसायटीमधील डॉ़ सरदेसाई, नाडकर्णी व चौथ्या मजल्यावरील एक फ्लॅट अशा आणखी तीन फ्लॅटमध्ये घरफोडी केले़ 
तसेच चोरट्यांनी एकाच रात्रीत सहकारनगरमधील सरोजिनी अपार्टमेंटमध्ये ५ ठिकाणी घरफोडी केली. त्यातील संजय लगड दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यादिवशी मध्य रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत चोरी करण्याचा प्रयत्न केला; तसेच त्याच सोसायटीमध्ये राहणारे सौरभ महाजन यांच्या फ्लॅट क्रमांक दोन आणि तीनमध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे. तसेच, चंद्रशेखर करमरकर आणि औसेकर यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे. सौरभ महाजन, चंद्रशेखर करमरकर व औसेकर बाहेरगावी असल्यामुळे चोरीचा ऐवज निश्चित सांगता येत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, एकाच रात्रीत दोन सोसायट्यांतील ८ घरफोड्या झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 
..........
पार्किंगमधील वाहनेही सुरक्षित नाही
शहरातील वर्दळीच्या सहकारनगर परिसरातील दोन इमारतीत चोरट्यांनी ९ घरफोड्या केल्या; तसेच इमारतीखाली पार्किंगमध्ये चंद्रशेखर करमरकर यांची उभी केलेली पाच लाख रुपयांची मोटार चोरट्यांनी पळवून नेली आहे. त्यामुळे बंद घरातील ऐवजासह पार्किंगमध्ये उभी केलेली वाहनेही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.
 

Web Title: theft in nine plats between at two societies in Sahakarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.