दिल्ली-एनसीआरमधील सर्वात उंच इमारतीपैकी एक असलेल्या सुपरटेक सुपरनोवा टॉवरमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नोएडातील सेक्टर १२५ मध्ये ही इमारत आहे. रवि असे तरुणाचे नाव असून तो त्याच्या मैत्रिणीसोबत इमारतीतील फ्लॅटमध्ये थांबलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचे नाव रवि आहे. तो त्याच्या मैत्रिणीसोबत सुपरनोवा इमारतीतील फ्लॅटमध्ये थांबला होता. पण, दुसरीकडे तो २४ तासांपासून बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी दिल्लीतील हौज खास ठाण्यात रवि बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. पोलीस त्याचा शोध घेत होती.
रवि त्याच्या मैत्रिणीसोबत सुपरटेक सुपरनोवा इमारतीतील फ्लॅटमध्ये थांबलेला होता. त्याने शुक्रवारी ३२व्या मजल्यावरून उडी मारली. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी रविच्या मैत्रिणीची चौकशी केली. पण, आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि दिल्लीतच राहत होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. आता त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.