गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:07 IST2022-03-02T17:43:07+5:302022-03-02T18:07:59+5:30

Crime News : या दाम्पत्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि नशेत असताना दोघांनीही गळ्यात साखळी बांधली होती.  

The woman tied the chain around his neck, then cut off his boyfriend's head | गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले

गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एका महिलेने आपल्या जोडीदाराचा गळ्यातील साखळीने गळा आवळून खून केला. मृत्यूनंतर महिलेने जोडीदाराच्या शरीराचे अनेक तुकडे केले. बादलीत डोकं टाकलं आणि शरीराचे इतर अवयव वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले. यापूर्वी या दाम्पत्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि नशेत असताना दोघांनीही गळ्यात साखळी बांधली होती.
 
हे प्रकरण अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यातील आहे. येथे ग्रीन बे शहरातील पोलिसांनी एका २४ वर्षीय महिलेला अटक केली आहे. टेलर एस असे आरोपी महिलेचे नाव आहे. महिलेवर जाणूनबुजून हत्या, मृतदेहाची गंभीर नासधूस आणि थर्ड डिग्री लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ग्रीन बे येथील घरातून पोलिसांना पीडितेचा मृतदेह सापडला. गुप्तचर पोलिसांनी सांगितले की, टेलरला पीडितेसोबत शेवटचे पाहिले होते. त्याचवेळी पोलिसांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी महिलेला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तिच्या कपड्यांवर आणि हातावर रक्त लागले होते. मिळालेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी टेलरच्या कारची झडती घेतली तेव्हा त्यांना पीडितेचा पाय आणि शरीराचे इतर अनेक अवयव सापडले.

प्राप्त तक्रारीनुसार, गुन्ह्याच्या ठिकाणी ड्रग्जचा वापर आणि रक्त साफ केल्याचे पुरावे मिळाले आहेत. जेव्हा पोलिसांनी टेलरला विचारले - काय झाले? तर महिलेने उत्तर दिले - हा एक चांगला प्रश्न आहे. ती दारूच्या नशेत असल्याचे टेलरने पोलिसांना सांगितले. महिलेने पीडितेसोबत मेथॅम्फेटामाइन नावाचे ड्रग्ज घेतले होते, असा पोलिसांचा अंदाज आहे. यानंतर पीडितेच्या गळ्यात साखळी बांधली आणि दोघांनी शारीरिक संबंध ठेवले. नंतर दारूच्या नशेत महिलेने जोडीदाराची हत्या केली.

 

Web Title: The woman tied the chain around his neck, then cut off his boyfriend's head