पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होतं अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:20 IST2025-09-09T12:31:37+5:302025-09-09T14:20:52+5:30
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

पत्नीचं परपुरुषासोबत सुरू होतं अफेयर, पतीला लागली कुणकुण अन् कांड झाला!
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातून पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या महिन्याच्या ३ तारखेच्या रात्री एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली होती. मृत व्यक्तीची ओळख गोल्ला अहोबिलम अशी झाली. जिल्ह्यातील अस्पारी मंडळातील दोडागुंडा आणि थोगरगल्लू गावांदरम्यान गोल्ला अहोबिलमची हत्या करण्यात आली. अस्पारी पोलीस या हत्याकांडाचा तपास करत होते. अस्पारी सीआय गंगाधर यांनी त्यांच्या पथकासह हे प्रकरण सोडवले.
पोलिसांनी या हत्येचा गुन्हा उलगडला आहे. गोल्ला अहोबिलमची हत्या त्याच्या पत्नी गंगावतीच्या प्रियकराने केली होती. पोलिसांनी हत्येतील आरोपीला अटक केली असून आरोपीचे नाव बसप्पा आहे. अहोबिलम दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील वाडिगेरी तालुक्यातील रत्नादिगी गावात त्याच्या कुटुंबासह राहायला आला होता
पत्नीचे प्रेम प्रकरण सुरू झाले अन्...
अहोबिलमची पत्नी गंगावती हिचे वाडीगेरी तालुक्यातील रत्नाडिगी गावातील बसप्पासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. या दरम्यान, अहोबिलमला त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली. यावरून त्यांच्यात अनेक वेळा भांडणे झाली. त्यानंतर अहोबिलम त्याची पत्नी गंगावतीसोबत त्याच्या गावी, थोगरगल्लूला परतला. इथेही गंगावतीचे तिच्या प्रियकर बसप्पासोबत प्रेमसंबंध सुरूच होते. दोघेही फोनवर एकमेकांशी बोलत असत.
दरम्यान, बसप्पाने अहोबिलमला मारण्याची योजना आखली. गंगावतीने तिच्या प्रियकर बसप्पाला सांगितले की, तिचा नवरा अहोबिलम त्याच्या मूळ गावी कलापरी येथे गेला आहे. तिथून जेवण केल्यानंतर, तो शेजारच्या थोगरगल्लू या गावी त्याच्या आईवडिलांच्या घरी जाईल. योजनेनुसार, बसप्पा कर्नाटकहून दुचाकीवरून अस्पारी येथे आला आणि तिथेच राहिला.
त्याने धारदार शस्त्राने केली हत्या...
यानंतर, बसप्पा ३ तारखेच्या रात्री ठोगारगल्लू गावाकडे निघाला , जिथे अहोबिलम दुचाकीवरून जात होता. बसप्पा देखील दुचाकीवर होता. यानंतर, त्याने वाटेत अहोबिलमला थांबवले आणि धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. अहोबिलमची हत्या केल्यानंतर बसप्पा घटनास्थळावरून पळून गेला. तथापि, आता आरोपी बसप्पा पोलिसांच्या ताब्यात आहे.