बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 16:42 IST2022-04-24T16:36:58+5:302022-04-24T16:42:17+5:30

Murder case : ख्वाजपूर भागात घडलेल्या हत्याकांडात मृत्यू झालेल्यांची राम कुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मिनाक्षी (२) अशी नावं आहेत.

The whole family died; Murder of 5 persons including 2-year-old girl at their residence | बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या

बापरे! कुटुंब संपवलं; २ वर्षाच्या मुलीसह ५ जणांची राहत्या घरात हत्या

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात काल सकाळी धक्कादायक घटना घडली आहे. २ वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील पाच जणांची त्यांच्या घरात हत्या झाल्याचे आढळून आल्याने खळबळ माजली आहे. ख्वाजपूर भागात घडलेल्या हत्याकांडात मृत्यू झालेल्यांची राम कुमार यादव (५५), त्यांची पत्नी कुसुम देवी (५२), मुलगी मनीषा (२५), सून सविता (२७) आणि नात मिनाक्षी (२) अशी नावं आहेत.

दुसरी नात साक्षीचा (५) जीव वाचला आहे, असे पोलिसांनी सांगितले. राम कुमार यादव यांचा मुलगा सुनील (३०) हा गुन्ह्याच्या वेळी घरी नव्हता, तो तपासात सहकार्य करत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय कुमार यांनी सांगितले की, मृतदेहावरील जखमांच्या खुणा पाहता या पाचही जणांच्या डोक्यावर प्रहार केल्याचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या भीषण गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सात पथके तयार करण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्याने पुढे  सांगितले.

श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञही मारेकर्‍यांपर्यंत पोहोचू शकणारे सुगावा गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेले जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार खत्री म्हणाले की, यादव यांच्या घराला आग लागली म्हणून स्थानिक रहिवाशांनी आरडाओरडा केला.

Web Title: The whole family died; Murder of 5 persons including 2-year-old girl at their residence