दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:10 IST2025-12-30T15:08:21+5:302025-12-30T15:10:22+5:30
Couple Ends Life after Love Marriage: पत्नीने स्वतःचे आयुष्य संपले. पत्नीच्या मृत्युचा पतीला धक्का बसला, त्यानंतर त्यानेही विष प्राशन केलं.

दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
२४ वर्षीय उमाश्री हिने घरातच आत्महत्या केली. तिचा मृतदेह पाहून पतीला धक्का बसला. त्यानंतर पतीने थेट विष प्राशन केले. या घटनेने संपूर्ण गाव हादरले. उमाश्री असे मयत महिलेचे नाव आहे. तर लगमण्णा हेग्गणावर याने विष घेतलेल्या पतीचे नाव आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नागराळ गावात ही घटना घडली आहे. पत्नीने घरातच गळफास घेतला. बाहेरून आलेल्या हेग्गणावर याने पत्नी उमाश्रीचा मृतदेह बघितला आणि त्याला धक्काच बसला.
सोमवारी रात्री २४ वर्षीय उमाश्रीने घरात गळफास घेतला आणि आत्महत्या केली. पत्नीचा मृतदेह बघितल्यानंतर लगमण्णा हेग्गणावर घाबरला. त्याने विष प्राशन केले.
ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
उमाश्री आणि लगमण्णा यांच्या गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. दीड वर्षापूर्वी उमाश्री आणि लगमण्णा यांनी प्रेमविवाह केला होता.
विवाहानंतर दोघांचाही संसार आनंदात सुरू होता. पण, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. वादाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण, याच वादातून उमाश्रीने आत्महत्या केली आणि त्यानंतर लगमण्णानेही आयुष्य संपवले.