नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:41 IST2026-01-07T08:40:43+5:302026-01-07T08:41:15+5:30
एका नराधम भावोजीने आपल्याच अल्पवयीन मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले अन्..

नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
'साली आधी घरवाली' असं गंमतीने म्हटलं जातं, पण याच नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना बिहारच्या पश्चिम चंपारणमध्ये उघडकीस आली आहे. एका नराधम भावोजीने आपल्याच १४ वर्षांच्या अल्पवयीन मेहुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली, तिने एका बाळाला जन्मही दिला. मात्र, दुर्दैवाने चार दिवसांतच बाळाचा मृत्यू झाला आणि पाप उघडकीस येण्याच्या भीतीने नराधम भावोजी फरार झाला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे धक्कादायक प्रकरण मझौलिया परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं लग्न पीडितेच्या थोरल्या बहिणीशी झालं होतं. सासुरवाडीला येणे-जाणे असल्याने त्याची नजर आपल्या १४ वर्षांच्या मेहुणीवर पडली. त्याने तिला गोड बोलून आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिला यातील गांभीर्य समजलं नाही.
बाळाचा जन्म आणि मृत्यू
काही महिन्यांनंतर जेव्हा पीडितेच्या शरीरात बदल दिसू लागले, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेने ३१ डिसेंबर रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. जन्मल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच या नवजात बालकाचा मृत्यू झाला. एका बाजूला मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं दुःख आणि दुसरीकडे बाळाचा झालेला मृत्यू यामुळे पीडितेच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.
वडिलांनी मांडली व्यथा
पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "माझी पत्नी हयात नाही. मी कामावर गेल्यावर माझी धाकटी मुलगी घरी एकटीच असायची. याच संधीचा फायदा घेत माझ्या जावयाने तिच्यावर वाईट नजर टाकली. आम्हाला कल्पनाही नव्हती की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला, तोच आमच्या घराची अब्रू वेशीवर टांगेल."
पोलिसांकडून शोध सुरू
या घटनेनंतर आरोपी मेहुणा घरातून पसार झाला आहे. चनपटिया पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत, लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील," असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात असून, नात्यातील विश्वासार्हतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.