नवविवाहितेशी मित्रासह पती बळजबरीने ठेवायचा संबंध; व्हिडिओही रेकॉर्ड करायचा मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 21:24 IST2022-07-08T20:10:14+5:302022-07-08T21:24:06+5:30
Rape Case : पतीने आपल्या मित्राकडूनही महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

नवविवाहितेशी मित्रासह पती बळजबरीने ठेवायचा संबंध; व्हिडिओही रेकॉर्ड करायचा मग...
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एका महिलेने तिच्या पतीवर बलात्कार, मारहाण, हुंड्यासाठी छळ यासह बलात्काराचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पतीने आपल्या मित्राकडूनही महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. आता आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खोराबार पोलिस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, परिसरातील जंगल चावरी येथील रहिवासी महिलेने तिच्या तक्रारीमध्ये सांगितले की, तिचा पती गेल्या 6 महिन्यांपासून दारूच्या नशेत आपल्या मित्रासोबत घरी येतो आणि संमतीशिवाय तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतो. यासोबतच तो त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंधही ठेवतो. प्रतिकार केल्याने तिला मारहाण केली जाते. एवढेच नाही तर पतीने जीवे मारण्याची आणि घराबाहेर हाकलून देण्याची धमकी दिली. हुंड्यासाठीही तिचा छळ केला जातो.
याप्रकरणी गावात पंचायतही झाली, पण पतीमध्ये काहीही सुधारणा झाली नसल्याचे पीडितेने सांगितले. 6 जून रोजीही पती विकी या मित्रासोबत घरात आला आणि दोघांनीही मारहाण केल्यानंतर तिच्यावर बळजबरीने आळीपाळीने बलात्कार केला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला.